एक्स्प्लोर
एकही लेक्चर नाही, तरीही उद्यापासून परीक्षा, मुंबई विद्यापीठाचा कारभार
एमएससी केमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजीची परीक्षा उद्या म्हणजेच 23 जानेवारीपासून घेण्यात येत आहेत. पण आश्चर्य म्हणजे या अभ्यासक्रमाची एकही तासिका झालेली नाही.

फाईल फोटो
मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या सत्र परिक्षा सुरु असताना आता एक नवीन गोंधळ समोर आला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून सत्र सुरु झालेल्या एमएससी केमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजीची परीक्षा उद्या म्हणजेच 23 जानेवारीपासून घेण्यात येत आहेत. पण आश्चर्य म्हणजे या अभ्यासक्रमाची एकही तासिका झालेली नाही. त्यामुळे आम्ही परीक्षा कशी द्यायची? असा प्रश्न मुंबई विद्यापीठात शिकत असलेले एमएससीचे विद्यार्थी विचारत आहेत. जवळपास 2 हजार विद्यार्थी एमएससी आभ्यासक्रमाची परीक्षा देत आहेत. मात्र, कॉलेजमध्ये तासिकाच न झाल्याने अभ्यासक्रमाबाबत कल्पना नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जावं लागत आहे. मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र विद्यार्थ्यांनी कुलगुरु आणि परीक्षा विभागाला दिलं आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी प्राध्यापकांची पण, परीक्षा वेळेत व्हाव्यात आणि निकाल लवकरात लवकर लावावे यासाठी आम्ही ही परीक्षा याआधी 26 डिसेंबरला घेण्याऐवजी पुढे ढकलून 23 जानेवारीला ठेवली असल्याचं परीक्षा विभागाने सांगितलं. शिवाय, अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी ही महाविद्यालय आणि प्राध्यापकांची असल्याचं स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र
विश्व























