No Honking Day : ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईत ‘नो हॉकिंग डे’ वाहन चालवतांना नियमांचे पालन करा; अन्यथा..
शहरातील वाढते ध्वनीप्रदुषणाचे गंभीर परिणाम लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिसांकडून ऑगस्ट महिन्यातील दोन दिवस म्हणजेच 9 आणि 16 आॅगस्ट रोजी "नो हॉंकिंग डे" ही मोहीम राबवली जाणार आहे
No Honking Day : शहरातील वाढते ध्वनीप्रदुषण आणि त्याचा मानवी शरीरावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिसांकडून ऑगस्ट महिन्यातील दोन दिवस म्हणजेच आज आणि 16 आॅगस्ट रोजी "नो हॉंकिंग डे" ही मोहीम राबवली जाणार आहे. शहरात माणसांची जेवढी गर्दी आहे, त्याहीपेक्षा जास्त गर्दी ही गाड्यांची आहे. यामुळे मुंबईकरांना दोन दिवसाकरीता कर्कश आवाजापासून दिलासा मिळणार आहे.
दिवसभरात अनेक लोक कित्येकदा विनाकारण हाॅर्न (Horn) वाजवतात. परिणामी ध्वनी प्रदूषण वाढते. या रोजच्या वाढत्या प्रदूषणाचा त्रास लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच होतो. यामुळे शहरातील महत्वाच्या
जंक्शनवर (Junction) वाहतूक पोलीस कडेकोट बंदोबस्त करणार आहेत. यावेळी पोलीस अधिकारी जागोजागी तैनात करून हाॅर्नबाबत विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. गरज असेल त्याच वेळी हाॅर्न वाजवा हा सल्ला प्रत्येकाला देण्यात येणार आहे.
'नो हाॅर्निंग' च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर करण्यात येणार कारवाई
वाहनचालकांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक प्रशासनाद्वारे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच 'नो हाॅर्निंग डे' या मोहीमेच्या वेळी लोकांना मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी लोकांची गर्दी जास्त दिसून येते. अशा वेळी हाॅर्न वाजवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. विनाकारण हाॅर्न वाजवणाऱ्यांना यावेळी पोलिस चौकीत दाखल केले जाणार आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी शहरातील लोकांना आवाहन केले आहे कि, या मोहिमेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा. तसेच ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण कमी करणे हा या मोहीमेचा मुख्य उद्देश असणार आहे. हाॅर्नच्या मोठ्या आवाजाने खूप लोकांना अकाली बहिरेपणा येण्याची शक्यता असते आणि आरोग्यावरही याचा मोठा परिणाम होतो. म्हणून 9 आणि 16 आॅगस्टला "नो हॉंकिंग डे"ही मोहीम राबवली जाणार आहे. तर मुंबई पोलिस काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना नो हॉन्किंगचे बॅनर दाखवून तसेच नो हॉर्निंगच्या मुद्द्यावर मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाणार आहे. सोबतच वाहनचालकांना त्यांच्या वाहनांचे हॉर्न आणि सायलेन्सर हे 1989 च्या केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या नियम क्र. 119 आणि 120 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आहेत याची खात्री करण्याचे आवाहन देखील मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं केलं आहे. तसेच कलम 194 (f) एमव्ही कायद्याअंतर्गत, एमव्ही कायद्याच्या कलम 198 नुसार नियमांचे उल्लंघन करणार्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.
येत्या बुधवारी करूया शांततेची वारी! #नो_हॉंकिंग_डे #९_ऑगस्ट pic.twitter.com/LZ2NXwS1NY
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 8, 2023
या खास मोहिमे संदर्भातील माहिती मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. जनजागृती करण्यासाठी 'नो हॉंकिंग डे' पाळला जाणार असून या उपक्रमाबाबत यात माहिती दिली असून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज नसतांना रस्त्यावर कुठेही हॉर्न वाजवणे चुकीचे असून त्यामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होते. त्यामुळे वाढत्या ध्वनी प्रदुषणावर आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस वाहतूक शाखेने 'नो हॉंकिंग डे' ही विषेष मोहीम राबवली आहे. आजच्या या मोहिमेत नियम मोडणाऱ्या अनेक वाहन चालकांवर कडक कारवाई देखीस करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या