Mumbai Traffic Police : चिंतामणी गणपतीच्या आगमनासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Mumbai Traffic Police : गणेशोत्सवादरम्यान मुंबई शहरात वाहतूक (Mumbai Traffic) सुरळीत राहण्यासाठी तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी चोख उपाययोजना केलेल्या आहेत
Mumbai Traffic Police : गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) (Ganesh Festival 2022) मुंबई शहरात वाहतूक (Mumbai Traffic) सुरळीत राहण्यासाठी तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी चोख उपाययोजना केलेल्या आहेत. दरम्यान चिंतामणी गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. जाणून घ्या कोणते मार्ग बंद असणार? तसेच कोणते पर्यायी मार्ग?
चिंतामणी गणपतीच्या आगमनासाठी मुंबईतील वाहतुक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या
मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवार, 27 ऑगस्ट रोजी चिंतामणी गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 12 ते रात्री 10 वाजे दरम्यान वाहतूक नियमनाच्या दृष्टीने खबरदारी घेत काही मार्ग बंद असतील. नागरिकांना विनंती आहे त्यांनी उपलब्ध पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यात यावे असे सांगण्यात आले आहे.
-सकाळी 12 ते रात्री 10 वाजे दरम्यान डॉ.बी.ए.रोड दक्षिण वहिनी भारतमाता जंक्शन ते बावला कंपाऊंड जंक्शनपर्यंत बंद राहील. नागरिकांनी करी रोड ब्रीज- आर्थर रोड नाका अथवा नाईक चौक-बॅरिस्टर नाथ पै मार्ग या मार्गांचा अवलंब करावा.
- सकाळी 12 ते रात्री 10 वाजे दरम्यान डॉ.बी.ए.रोड उत्तर वहिनी बावला कंपाऊंड जंक्शन ते भारतमाता जंक्शनपर्यंत बंद राहील. नागरिकांनी टी.बी.कदम मार्ग - अल्बर्ट जंक्शन या मार्गाचा अवलंब करावा.
- सकाळी 12 ते रात्री 10 वाजे दरम्यान चिंचपोकळी जंक्शन ते साने गुरुजी मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील. नागरिकांनी एन.एम.जोशी मार्ग ते खडापारसी जंक्शन या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
चिंतामणी गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर दि. २७.०८.२०२२ रोजी स. १२ ते रा. १० दरम्यान वाहतूक नियमनाच्या दृष्टीने खबरदारी घेत काही मार्ग बंद असतील. नागरिकांना विनंती आहे त्यांनी उपलब्ध पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.#MTPTrafficUpdates
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 26, 2022
चिंतामणी गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर दि. २७.०८.२०२२ रोजी स. १२ ते रा. १० दरम्यान डॉ.बी.ए.रोड दक्षिण वहिनी भारतमाता जंक्शन ते बावला कंपाऊंड जंक्शनपर्यंत बंद राहील. नागरिकांनी करी रोड ब्रीज- आर्थर रोड नाका अथवा नाईक चौक - बॅरिस्टर नाथ पै मार्ग या मार्गांचा अवलंब करावा.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 26, 2022
पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना
गणेशोत्सवादरम्यान गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई या महत्त्वाच्या विसर्जन ठिकाणी मुंबई शहर वाहतूक पोलीसांचे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेली आहेत. गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan 2022) दरम्यान वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी निरिक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, गणेशोत्सवादरम्यान 1 सप्टेंबर, 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर, 6 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत खालील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
-74 रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील
-54 रस्ते एक दिशा मार्ग असतील
-57 रस्ते मालवाहू वाहनांना प्रवेश बंद असतील
-114 ठिकाणी जो पार्किंग घोषित करण्यात आलेली आहे.
संबंधित बातम्या