Atal Setu : फोन घरी ठेवून कोणालाही न सांगता घरातून निघाले, अटल सेतूवर गाडी थांबवली अन्..., अलिबागच्या शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय प्रकरण?
Atal Setu : अलिबागमधील एका शिक्षकाने अटल सेतूवरून खाली उडी मारून आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. वैभव इंगळे असं या शिक्षकाचं नाव आहे.

Teacher Attempts Suicide from Atal Setu : मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी बांधण्यात आलेल्या अटल सेतू वरून मोठ्या प्रमाणात आत्महत्या करण्याचं प्रमाणा वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. मात्र, अटल सेतू सुसाईड पॉईंट झाला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अटल सेतूवर वारंवार होणाऱ्या आत्महत्येच्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच आणखी एक आत्महत्या घडल्याची घटना समोर आली आहे. अलिबागमधील एका शिक्षकाने अटल सेतूवरून खाली उडी मारून आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. वैभव इंगळे असं या शिक्षकाचं नाव आहे. वैभव हे अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डुस येथील रहिवासी होते.
अटल सेतूवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
वैभव इंगळे या शिक्षकाने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. वैभव इंगळे आपल्या कारमधून सकाळी अटल सेतूवरून जात होते. अटल सेतूवरून जात असताना त्यांनी आपली कार थांबवली. त्यानंतर अटल सेतूवरून त्यांनी उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने असं टोकाचं पाऊल का उचललं? याचा तपास पोलीस करीत आहेत.
नेमकं काय कारण?
काल (शुक्रवारी, ता-15) सकाळा 9 च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वैभव इंगळे यांचा शोध पोलीस घेत आहे. वैभव यांनी सेक्सटॉर्शनमुळे आणि मिळणाऱ्या धमक्यांमुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. ते पनवेल तालुक्यातील कुर्डुस गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. समाजात बदनामीची भीती असल्याने त्यांनी जीवन संपवण्यासाठी टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातं आहे.
फोन घरीच ठेवला अन्...
वैभव इंगळे सकाळी 7.30 वाजता घरात काहीच न सांगता घराबाहेर पडले. त्यांनी त्यांचा मोबाईल फोन घरीच ठेवला, त्यानंतर ते चिरनेरमार्गे अटल सेतू पुलापर्यंत गेले. पुढे पुलावरती जवळजवळ 9 किलोमीटर अंतर गाडी चालवल्यानंतर त्यांनी गाडी पार्क केली आणि काही क्षणातच त्यांनी पुलावरून उडी मारली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गाडी पार्क केल्याची घटना कैद झाली आहे. त्यापूर्वीच वैभव पिंगळे हे समुद्रात वाहुन गेले होते. त्यानंतर उलवे पोलिसांनी व सागरी सुरक्षा विभागाने त्यांची शोधमोहीम सुरु केली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नव्हता.























