एक्स्प्लोर

Mumbai School Reopening मुंबईतील शाळा उद्यापासून नव्हे 15 डिसेंबरपासून सुरू होणार

Mumbai School reopening : मुंबईत शाळा सुरु करायच्या की नाही याबाबत पालिका आयुक्त आणि शिक्षणाधिकारी यांच्यात बैठक झाली.

Mumbai School Reopening : राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी मुंबईत मात्र, 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. मुंबई महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता. त्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा या उद्यापासून सुरू करता 15 डिसेंबरपासून सुरू करण्यात यावा असा निर्णय घेण्यात  आला आहे. शाळा सुरू होईपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरूच राहणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. 

शिक्षणाधिकारी यांनी आयुक्तांकडे शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला असून याला मंजुरी मिळणार की नाही? याबाबत चर्चा सुरू होती. उद्यापासून टप्प्याटप्प्याने जरी शाळा सुरू करायचं तरी सुद्धा कुठल्या प्रकारच्या सूचना अद्याप न मिळाल्याने शाळेची तयारी झालेली नसल्याचे शिक्षकांनी म्हटले होते. 

मुंबईत शाळा सुरु करायच्या की नाही याबाबत पालिका आयुक्त आणि शिक्षणाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मुंबईत महापालिकेने शासन आदेश येऊनही शाळा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे शिक्षक-पालकांमध्ये संभ्रम तयार झाला होता.

नाशिक पालिका हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. नाशिक पालिका या संदर्भात १० डिसेंबरला निर्णय घेणार आहे.

शाळा सुरू करण्याबाबतचे आदेश सरकारने दिल्यानंतर शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

काय आहेत शिक्षण विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना?

  • दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतोवर किमान सहा फूट अंतर ठेवावे
  • शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे
  • वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी
  • शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे
  • शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितिची पद्धतीचा अवलंब करू नये
  • शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम , खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात
  • ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती नसावी
  • मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये ,आवश्यक नियमांचे पालन करावे
  • क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी
  • शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोनाबाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा
  • शाळांची वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे 
  • शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नये
  • यामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी एका वर्गात बसतील.
  • एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशाप्रकारे नियोजन करावे सोबतच विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्यात यावी
  • शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना  टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे
  • शहरी भागात महापालिका आयुक्त व इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी ,नगर परिषद यांनी शिक्षणाधिकारी ,आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक संबंधित सूचना कराव्यात
  • या आधीच्या टप्प्यांमध्ये ज्याप्रकारे ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तर महापालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायती ,ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आले आहेत.  त्या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी चर्चा करावी
  • पालकांच्या संमती शाळेत येण्यासाठी आवश्यक असणार आहे, पालकांचे संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकेल

पाहा व्हिडिओ: सरकारचं ठरलं, विद्यार्थ्यांचं काय?

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Pune Coronavirus Update : ओमिक्रॉनच्या धास्तीनं पुण्यात पुन्हा निर्बंध; वाचा सुधारीत नियम

मुंबई महापालिकेच्या लसीकरण मोहिमेवरून नितेश राणे यांचे आदित्य ठाकरे यांना पत्र, म्हणाले...

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
Embed widget