एक्स्प्लोर

मोठ्या भावाच्या पाठीशी खंबीर, संजय राऊतांना प्रत्येक टप्प्यावर सुनिल राऊतांनी दिली साथ

Sanjay Raut granted bail : संजय राऊत यांची ईडीची चौकशी, अटक आणि पुढे कोर्ट कचेऱ्या यामध्ये सातत्याने संजय राऊत यांचे लहान बंधू सुनिल राऊत हे ठाम त्यांच्या मागे उभे असल्याचे पाहायला मिळाले.

Mumbai Sanjay Raut granted bail : हल्ली भावा-भावांची भांडण आपण अनेकदा  कोर्ट कचऱ्यांमध्ये व ईतर मार्गे असल्याच्या अनेक बातम्या आपण पाहतो व ऐकतो. मात्र या बातम्यांमध्ये आणि भावा भावांच्या वादाला संजय राऊत आणि त्यांचे लहान भाऊ अपवाद ठरताना काही दिवसांमध्ये पाहायला मिळालं आहे, याची चर्चा आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये संजय राऊत यांच्या संदर्भात ईडीची चौकशी , त्यानंतर झालेली अटक आणि पुढे कोर्ट कचेऱ्या यामध्ये सातत्याने संजय राऊत यांचे लहान बंधू सुनिल राऊत हे ठाम त्यांच्या मागे उभे असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या सर्व घडामोडीत राऊतांच्या पाठीशी हा भाऊ खंबीर होता, याचे कौतुक सर्वत्र होते आहे.

घर ते तुरुंगापर्यंत भावाच्या पाठीशी सुनिल राऊत होते 
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचा प्रकरणांमध्ये अखेर आज जामीन मिळालेला आहे. यानंतर आज ते आर्थर रोड तुरुंगातून आपल्या घरी रवाना झाले आहेत. संजय राऊत बाहेर पडल्यानंतर संजय राऊत यांची जोरदार चर्चा आहे. माञ या त्यांच्या मागे खंबीर उभे असलेल्या भावाची देखील चर्चा जोरदार सुरू आहे.गेल्या चार महिन्यांपासून कोर्टात व पोलीस स्टेशनपर्यंत संजय राऊत यांच्या मागेपुढे सुनिलराऊत हे कायम पाहायला मिळत होते. संजय राऊत यांच्या सर्व कायदेशीर बाबींसाठी सुनिलराऊत हे सर्वांशी चर्चा करत पाठपुरावा करत होते.

सुनिल राऊत कोण आहेत ?
खासदार संजय राऊत यांचे सुनिल राऊत हे लहान बंधू आहेत.  मोठ्या भावाचा आदर्श घेत राजकारणात उतरलेल्या सुनिलराऊतांचा माध्यमांशी पुरेसा संवाद नसतो. त्यांना माध्यमांशी फार कमी वेळा बोलताना बघितले जाते. संजय राऊतांसोबत असलेल्या त्यांचे भाऊ सुनिलराऊत यांचाही चांगला राजकीय इतिहास आहे. मुंबई उपनगर भागात सुनिलराऊत यांचा चांगला प्रस्त आहे. विक्रोळी मतदारसंघातून ते आमदार आहेत.

कोणकोणती पद भूषवली सुनिलराऊत यांनी ?
याशिवाय सुनिलराऊत यांनी आतापर्यंत राजकारणात खालील पदे भूषवली आहेत.२०१४ - या वर्षात सुनिलराऊत महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडून आले.२०१५ - या वर्षात सुनिलराऊत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून आले. २०१९ - परत एकदा महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडून आले.२०२१ - या वर्षात मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची फेरनिवड झाली.

संजय राऊत यांच्यानंतर सुनिलराऊत भक्कम होते?
२०१९ मध्ये सुनिलराऊतांना मंत्रीपद न मिळाल्यानं ते नाराज असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. तसेच सुनिलराऊत हे संजय राऊत यांचे भाऊ असल्याने त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता होती. मात्र, त्यांचं नाव मंत्रिमंडळाच्या यादीत न आल्याने त्यांचे मोठे बंधू संजय राऊत नाराज असल्याची चर्चा सुरू रंगली होती. मात्र यावर त्यावेळी संजय राऊत आणि सुनिलराऊत स्पष्टच बोलले होते. 'तीन पक्षांत सरकार असल्यानं वाट्याला मंत्रीपदं कमी आलीत. मात्र यावर आम्ही नाराज नाही. आम्ही मागणारे नसून आम्ही पक्षाला देणाऱ्या लोकांपैकी आहोत.' असंही यावेळी राऊत बंधू म्हणाले होते. तसेच शिवसेनेत बंड झाल्यानंतर सुनिलराऊत देखील गेले अशी चर्चा होती मात्र ती चर्चा देखील खोटी ठरली होती. संजय राऊत हे तुरुंगात गेल्यानंतर सुनिलराऊत हे भक्कमपणे संजय राऊत यांची भूमिका सर्वत्र मांडत होते.

संजय राऊत आणि सुनिलराऊत यांच्याबद्दल सध्या काय चर्चा?
सुनिलराऊत यांना घडवण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे असं त्यांच्यासोबत असणारे त्यांचे सहकारी सांगतात. त्यामुळे सुनिलराऊत हे संजय राऊत यांच्या शब्दापुढे कधीही जात नाही. आपला मोठा भाऊ संकटात असताना सुनिलराऊत यांनी हवे ते प्रयत्न या काही महिन्यांमध्ये केले आणि संजय राऊत यांच्या नंतर कुटुंबाचा आधार म्हणून ते काही दिवसांपासून दिसत होते. आज देखील संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले त्यावेळी त्यांच्या गाडीचे चालक म्हणून सुनिलराऊत स्टेरिंग वर पाहायला मिळाले. तर सुनिलराऊत हे कशाप्रकारे संकट काळात संजय राऊत यांच्या पाठीशी भक्कम होते आणि भावांची जोडी असावी तर अशी  असावी अशी चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget