एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Rape Case : साकीनाका घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश

Mumbai Rape Case : साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Mumbai Rape Case : मुंबईतील उपनगर साकीनाका (Mumbai Sakinaka Rape Case) येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे. दरम्यान यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो  आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

संतापाची लाट उसळली! संतप्त प्रतिक्रिया, पीडितेच्या मृत्यूनंतर विरोधी पक्ष आक्रमक, आरोपीला फाशी देण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

Mumbai Rape Case :  साकीनाका अत्याचार पीडित महिलेची मृत्युशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार, नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी-फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साकीनाक्यात घडलेला हा प्रकार मन सुन्न करणारा आहे. ज्याप्रकारे गेल्या महिन्याभरात बलात्काराच्या घटना घडत आहेत, त्याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. राज्यात विविध ठिकाणी अशा घडत आहेत. अतिशय भयंकर अशा या घटना आहे. मुंबईसारख्या सुरक्षित शहरात अशा घडल्यानं लौकिकाला धक्का पोहोचतो. हा प्रकार तर माणुसकीला काळिमा फासणारा आहे. आमची मागणी आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा, फास्टट्रॅक कोर्टात हे प्रकरण न्यावं. आणि नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. शक्ति कायद्यासंदर्भात बैठकांवर बैठका चालल्या आहेत. अशा केसेस फास्टट्रॅक कोर्टातही चालवल्या जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टाला अशी विनंती करावी, असंही ते म्हणाले. महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यासाठी सरकारला वेळ नाही, असं ते म्हणाले. 

आम्हाला माफ कर ताई - चित्रा वाघ

पीडितेच्या मृत्यूचं वृत्त कळल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भावनिक होत म्हटलं आहे की, साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. या प्रकरणात तिचा काय दोष होता. हे एका माणसाचं काम नाही. तिला काय वेदना झाल्या असतील पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणं देणं नाही. सरकारसाठी हा मृत्यू म्हणजे फक्त अजून 1 नंबर. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेताना. नाही वाचवू शकलो तुला, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. आम्ही फक्त घोषणा करु शकतो बाकी काही नाही, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काल म्हटलं होतं की, एका आरोपीला आता अटक केली आहे. पण मला खात्री आहे की यात आणखी नावं समोर येतील. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांची बोटं छाटली जात आहेत, कुठं एफआयआर नोंदवली जात नाही. गणरायानं या सरकारला सद्बुद्धी द्यावी, महिला आणि मुलींवरील अत्याचारावर फक्त भाषणं करण्याऐवजी त्यावरील कायद्यांची प्रभावी अमलबजावणी व्हावी, असं वाघ म्हणाल्या.

 शक्ती कायदा आणणार होते त्याच काय झालं- प्रवीण दरेकर 
सरकारनं जबाबदारी स्वीकारायला पाहिजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री वळसे पाटील यांनी चर्चा करून कारवाई करावी. राज्यात काय चाललंय एकामागोमाग एक घटना होत आहेत .  आम्ही काही बोललो का बोलायचं की आम्ही राजकारण करतो  हे योग्य नाही राज्यात कायद्याचा धाक राहिला नाहीय.  शक्ती कायदा आणणार होते त्याच काय झालं, असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.  

Mumbai Rape Case :  साकीनाका अत्याचार पीडित महिलेची मृत्युशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

या प्रकरणी आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं होतं की, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते.

मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती.. 32 वर्षीय महिलेवर टेम्पोमध्ये बलात्कार, अत्याचारानंतर अमानुषपणे मारहाण

कठोरात कठोर शिक्षा केली जाईल गृहमंत्री : दिलीप वळसे पाटील

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते की, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा केली जाईलच, पण त्यापुढे जाऊन यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा ही तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. तसा अहवाल वेळोवेळी पोलीस सादर करतील, असं वळसे पाटील म्हणाले.

फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवला पाहिजे- नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, ही दुःखद घटना आहे, यामध्ये चार्टशीट लवकर दाखल झाली पाहिजे. लवकर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवला पाहिजे. सरकार त्यादृष्टीने पावले टाकत आहेत. या घटनेचे समर्थन कुणी करत नाही आणि जो आरोपी आहे त्याला देखील वाचवायचा प्रयत्न कोणीही करत नाही. विरोधक प्रश्न विचारतात हे त्यांचे काम आहे. मात्र जे प्रश्न विचारतात त्यांच्या पक्षात इतर राज्यात ज्या घटना घडल्या त्यामध्ये कुठल्या प्रकारे सरकारने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला हे जनतेच्या समोर आहे. मात्र हे सरकार तसे करत नाही, निश्चित पणे मुंबई अजूनही सुरक्षित आहे, ही घटना घडली ते दुःखद आहे, मात्र आरोपी वाचणार नाही, सरकार फास्ट ट्रॅक खटला चालवेल, असं नवाब मलिक म्हणाले.

आरोपीला भादंविच्या कलम 307, 376 अंतर्गत अटक करण्यात आली
काही पुराव्यांच्या आधारे आरोपीला भादंविच्या कलम 307 (खुनाचा प्रयत्न) आणि 376 (बलात्कार) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. घटनेसंबंधी पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठरावBaba Adhav Pune :  आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढावCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Ranbir Kapoor : पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Mahayuti Government: गृहमंत्रीपदी डॅशिंग नेता हवा, अर्थखात्याचा कारभारही सक्षम माणसाच्या हातात हवा; शिंदे गटाच्या नेत्याने शड्डू ठोकला
भाजपला मुख्यमंत्रीपद गेल्यास गृहमंत्रीपद आमच्याकडे, हा नैसर्गिक नियम; शिंदे गटाच्या नेत्याने शड्डू ठोकला
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget