एक्स्प्लोर
मुंबईत 'पाऊस'फुल्ल, 'या' रस्त्यांवरुन जाणं टाळा
मुंबईतल्या बहुतांश रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं आहे. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे मार्गाचे तीनतेरा वाजले आहेत. मुंबईतल्या बहुतांश रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
मुख्य रस्त्यांवरील स्थिती काय?
- वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
- इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अमर महल जंक्शनजवळ एस जी बर्वे रोड, व्हीएन पुरव रोडवर पाणी साचलं, माटुंग्याहून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक वडाळ्याच्या दिशेने वळवली
- जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) जवळपास संपूर्ण मार्गावर पाणी साचलं
- खार-वांद्रे एसव्ही रोडवर पाणीच पाणी
- हिंदमाताजवळ पाणी साचल्याने वाहतुकीचा बोजवारा
- अंधेरी-कुर्ला रोडच्या सुरुवातीला पाणी साचल्याने वाहतूक मंदावली
- मुंबईतील सात रस्ता परिसरातील पेट्रोल पंपजवळ झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा
- सिद्धीविनायक मंदिर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं
- सायन ते दादर दरम्यान रस्ते वाहतूक ठप्प
- सांताक्रुझ-कुर्ला लिंक रोड (एससीएलआर) वर मोठी वाहतूक कोंडी
- वरळी सी फेसच्या दिशेने रस्त्यावर ट्राफिक जॅम
- भायखळा स्टेशनजवळ राणीची बाग बस स्टॉपच्या दिशेने पॅलेस सिनेमाजवळ पाणी साचलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement