Mumbai Rains alert: मुंबईत अचानक इतका पाऊस का पडतोय? हवामान तज्ज्ञांनी कारण उलगडून सांगितलं
Mumbai Rains alert: मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक तास सुरु असलेल्या पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली आहे.

Mumbai Heavy Rain: गेल्या काही तासांपासून मुंबईत थोडाही खंड न पडता मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले असून रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत (Mumbai News) संततधार पाऊस सुरुच आहे. मात्र, सोमवारी पहाटेपासून या पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच इतका पाऊस पडला आहे. गेल्या अनेक तासांपासून सुरु असलेल्या या पावसाचा जोर थोडाही कमी होताना दिसत नाही. मात्र, अचानक मुंबईत इतका पाऊस (Rain News) का पडू लागला आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पुणे वेधशाळेने यामागील कारण स्पष्ट केले आहे.
मध्य पश्चिम बंगालच्या समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र काल तयार झाले आहे. त्यामुळे आपण बघतोय महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाण पाऊस पडताना दिसत आहे. मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. उत्तर कोकण ते केरळपर्यंत महाराष्ट्राचे घाटमाथे आणि पठारी भागातही आपल्याला गेल्या 24 तासांत पाऊस पडताना दिसत आहे. दोन दिवस कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पठारी भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. दोन दिवसांनी पावसाची तीव्रता कम होण्याची शक्यता आहे, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
किनारपट्टीचा प्रदेशापासून कोकणापासून केरळपर्यंत पाऊस कोसळत आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आणि विदर्भात सतत पाऊस पडतोय. महाराष्ट्रातील अनेक भागात संपूर्ण ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल. मुंबई, पुणेसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचे क्षेत्र काल निर्माण झाल्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस होईल आणि त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा सुद्धा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळेच मुंबईत अचानक पावसाचा जोर वाढला. मुंबईत आज आणि उद्या अतीमुसळधार पावसाची शक्यता असून बुधवारपासून पावसाचा जोर कमी होईल, असा पूर्वानुमान हवामान शास्त्रज्ञ यांनी व्यक्त केला आहे.
Konkan Rain: पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट घोषित
पालघर जिल्ह्यात पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबई, कोकणला रेड अलर्ट असून पुण्यातील घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुढील पाच दिवस मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.
आणखी वाचा

























