Mumbai Rain VIDEO : आजही मुसळधार पाऊस पडणार, मुंबई आणि उपनगरातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Maharashtra Rain Update : गुरूवारी मुंबई आणि परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.
Mumbai Rain Update : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सकाळी 8.30 वाजेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (दिनांक 26 सप्टेंबर 2024) सकाळी 8.30 पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (दिनांक २६ सप्टेंबर २०२४) सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 25, 2024
या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुटी…
लोकल सेवा ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी
मुंबईत बुधवारी दिवसभर पावसाची हजेरी आहे. संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम मुंबई लोकलसेवेवर झाल्याचं दिसलं. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली होती. विक्रोळी, कांजूर, भांडुप या स्टेशन दरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे घाटकोपर स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. नंतर काही वेळानंतर लोकलसेवा पूर्ववत झाली.
अंधेरी, गोरेगावमध्ये पावसाची बॅटिंग
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली,दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात मुसळधार पाऊस पडला. मुंबईच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याचं दिसतंय.
ही बातमी वाचा: