एक्स्प्लोर

Mumbai Rain : मुंबईकरांनो, गरज असेल तरच घराबाहेर पडा; पुढील 3 ते 4 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain Update : मुंबईत पहिल्याच पावसाने  मुंबईकरांसह आणि प्रशासनाची चांगलीच त्रेधातिरपीट उडाल्याचं चित्र आहे. पुढील तीन ते चार तासांसाठीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मुंबई : रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस अजूनही कायम असून त्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसतंय. आताही पुढील तीन ते चार तासांसाठी मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटीसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचवेळी जोरदार वारेही वाहणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं. त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे. 

मुंबईत रविवारपासून सुरू झालेला पाऊस सोमवारीही कायम आहे. गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत 135.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरांत 19 मिमी पावसाची नोंद झाली तर पश्चिम उपनगरात 15 मिमी पाऊस झाला. सायनमध्ये 43 मिमी तर मुंबई विमानतळ भागात 33 मिमी पाऊस झाला. 

Mumbai Hindmata Rain Update : हिंदमातामध्ये पुन्हा पाणी साचलं

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह पनवेल, रायगडमध्ये पाणी साचलं. किंग्ज सर्कल, हिंदमातासारख्या सखल भागात पाणी साचलं आहे. तर मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर पाणी साचलं. तर केईएम रुग्णालयातही पाणी शिरलं. बदलापूरही मुसळधार पावसाचा फटका बसला. पनवेलमध्ये पावसचं पाणी घरात शिरल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालं. याशिवाय रायगडमध्ये पूल पाण्याखाली गेला आहे. 

Mumbai Aqua Line Metro Ration : भूयारी मेट्रो स्थानक जलमय

तब्बल 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने मुंबईकरांसह आणि प्रशासनाची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. पहिल्या पावसात मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचे दिसून आले. यात आता यामध्ये भूमिगत मेट्रोचीही भर पडली आहे.

आरे जेव्हीएलआर ते वरळी ही मेट्रो-3 मार्गिका नुकतीच पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच वरळी ते मरोळ या मार्गिकेचे सरकारकडून लोकार्पण करण्यात होते. मात्र मुंबईच्या पहिल्याच पावसात  भुयारी मेट्रोच्या वरळी आचार्य अत्रे स्थानकात पाणी शिरले. हे पाणी आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाच्या छतातून खाली कोसळत होते. छतातून कोसळणाऱ्या पाण्याच्या धारांमुळे संपूर्ण स्थानक जलमय झाले होते. त्यामुळे ॲक्वा लाईन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-3 चे आचार्य अत्रे स्थानक खरोखरच जलमय झाले होते.

Mumbai Monsoon Update : मुंबईमध्ये मान्सून लवकर धडकला

राज्यासह आता मुंबईत देखील मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसेच मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. सरासरी मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख 11 जून आहे. यंदा मान्सून 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झाला आहे. यंदा पहिल्यांदाच मान्सून लवकर धडकला. याआधी मान्सून 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. मात्र यंदा पहिल्यांदाच मान्सून मुंबईत लवकर धडकला आहे. मान्सून 26 मे रोजी मुंबई दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
Mumbai MHADA: देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर
देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर
Anil Parab : मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget