एक्स्प्लोर

मुंबईचा डब्बेवाला संकटात! 5000 पैकी फक्त 1500 डबेवाले शिल्लक

Mumbai Rain Live Updates : मुंबईत सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

LIVE

Key Events
मुंबईचा डब्बेवाला संकटात! 5000 पैकी फक्त 1500 डबेवाले शिल्लक

Background

Mumbai Rain Live Updates : सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर कुठं पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर आणि ठाणे जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान, आज मुंबई महानगराला दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज (गुरुवार दिनांक 27 जुलै 2023) रोजी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान आज मुंबईसह कोकण विभागाही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय. दुसरीकडे संपूर्ण विदर्भात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मुंबईत आज अति मुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुट्टी

मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रत्नागिरी, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना देखील आज सट्टी जाहीर करण्या तआली आहे. 

19:34 PM (IST)  •  28 Jul 2023

Eknath Shinde : ठाकरे गटाला गळती सुरूच, माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांचा शिंदे गटात प्रवेश 

मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक आणि शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

15:07 PM (IST)  •  28 Jul 2023

मुंबईचा डब्बेवाला संकटात! 5000 पैकी फक्त 1500 डबेवाले शिल्लक

Mumbai Dabbawala : वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन डिलिव्हरी, शाळेत आणि कार्यालयात उघडलेल्या कॅन्टीन यामुळे आता डब्बे कमी झाले आहेत. त्यामुळे सहाजिकच डबेवाल्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. Read More
13:34 PM (IST)  •  28 Jul 2023

मुंबईतील पावसाचा जोर ओसरला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार

Mumbai Rain : मुंबईतील पावसाचा जोर ओसरला 

मुंबईला आजसाठी प्रादेशिक हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी 

दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा मुंबईत पावसाचा जोर बघायला मिळू शकतो 

पालघर, ठाणे आणि रायगड परिसरात आज काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम 

सिंधुदुर्गातील पावसाचा जोर देखील कमी झाल्याची माहिती 

पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपुरसाठी आॅरेंज अलर्ट जारी 

मराठवाड्यात देखील आजपासून कमी होणार 

दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कायम

11:54 AM (IST)  •  28 Jul 2023

Pune-Mumbai Express Way : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 'या' वेळेत आज मेगाब्लॉक

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज ही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दोन तासांच्या या ब्लॉकमध्ये पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड हटवली जाणार आहे. Read More
11:30 AM (IST)  •  28 Jul 2023

वसईत मागील 24 तासात 138 मिमी पाऊस, सनसिटी गास रोड सलग अकराव्या दिवशी पाण्याखाली

Vasai Rains : वसई विरार आणि नालासोपारा शहरात काल दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं होतं. आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी, अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. शहरातील सखल भागात पाणी साचलेलं आहे. विरारचा विरार-बोलींज रस्ता, विवा कॉलेज रोड, एम.बी. इस्टेट, नालासोपारातील निळमोरे गांव, सेंट्रल पार्क, विजय नगर, आचोळे रोड, गास रोड, तसेच वसई पारनाका, डी.जी.नगर, सी कॉलनी, समता नगर इत्यादी सखल भागात पाणी साचलेलं आहे. पाण्यातून वाहन काढताना वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. तर आजही सलग अकराव्या दिवशी गास सनसिटी रोड पाण्याखाली आहे. काल सकाळी 8 ते आज सकाळी 8 वाजेपर्यंत वसई तालुक्यात 138  मीमी पाउस पडला आहे.  दिवसभरात पावसाचा जोर वाढला तर सखल भागातील नागरिकांच्या घरातही पाणी शिरु शकते.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget