मुंबईचा डब्बेवाला संकटात! 5000 पैकी फक्त 1500 डबेवाले शिल्लक
Mumbai Dabbawala : वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन डिलिव्हरी, शाळेत आणि कार्यालयात उघडलेल्या कॅन्टीन यामुळे आता डब्बे कमी झाले आहेत. त्यामुळे सहाजिकच डबेवाल्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.
![मुंबईचा डब्बेवाला संकटात! 5000 पैकी फक्त 1500 डबेवाले शिल्लक mumbai Dabbawala in trouble because of work from home online delivery open canteens in schools and offices मुंबईचा डब्बेवाला संकटात! 5000 पैकी फक्त 1500 डबेवाले शिल्लक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/28/d5f5a986a983206674c9efb53b5a057d1690537043461322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Dabbawala News : गेले अनेक वर्ष महाराष्ट्रासह जगभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारा मुंबईचा डबेवाला. हाच मुंबईचा डबेवाला सध्या रोजगार कमी झाल्यामुळे मोठ्या संकटात आहे. कोरोनानंतर अजुनही डब्बेवाले संकटात आहेत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन डिलिव्हरी, शाळेत आणि कार्यालयात उघडलेल्या कॅन्टीन यामुळे आता डब्बे कमी झाले आहेत. त्यामुळे सहाजिकच डबेवाल्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.
मुंबईचा डब्बेवाला संकटात!
50 वर्षीय अशोक कुंभार, मुंबईतील अंधेरी ईस्ट परिसरात राहतात. गेल्या 30 वर्षापासून ते मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करतात. कुटुंबात चार लोक आहेत. दोन मुलं सध्या शाळा कॉलेज करतात, तर पत्नी गृहिणी आहे. गेल्या अनेक वर्षापासून डब्बे पोहोचवून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. कोरोना पूर्वी ते 20 ते 25 हजार कमावत होते आता 12 ते 15 हजार रुपये कमवतात. त्यांना आता घरं चालवणंही कठीण झालं आहे.
5000 पैकी फक्त 1500 डबेवाले शिल्लक
अशोक कुंभार यांच्या वयापेक्षा कमी असलेले विश्वनाथ दिंडोरे हे 32 वर्षीय तरुण. गेल्या बारा वर्षापासून डबा पोहोचवण्याचं काम करतात. मात्र, सध्या यातून उत्पन्नच मिळत नसल्यामुळे ते जोडीने लोडरचं काम करतात. डब्बे वाले मेहनत जास्त करत आहे, पण त्यांना कमी पैसे मिळत आहेत. त्यामुळे घरं चालवणं कठीण होऊन बसलं आहे. यामध्ये वयोवृद्ध लोकांवर जास्त परिणाम झाला आहे. कारण ते पार्ट टाईम जॉबही करू शकत नाहीत.
मेहनत जास्त पण, उत्पन्न कमी
मुंबईत डबे पोहोचवत असताना या व्यवसायामध्ये अनेक समस्या असल्याने काही डबेवाले हे आपल्या गावाकडे गेले, तर काही डबेवाले मुंबईत दुसऱ्या कामांकडे वळले आहेत. त्यामुळे सध्या शिल्लक असलेल्या 1500 डबेवाल्यांना टिकवून ठेवण्यासाठी आणि डबेवाल्यांची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी सरकार दरबारी मुंबईचा डबेवाला आपल्या मागण्या मांडत आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाच आणि सरकारचा दुर्लक्ष होतंय, त्यामुळे डब्बेवाले आणखी त्रस्त आहेत.
जुनी परंपरा टिकवण्यासाठी प्रयत्न
आताच्या युगातल्या या सर्व स्पर्धेत जुनी परंपरा असलेले मुंबई डबेवाले, त्यांना असलेल्या विविध अडथळ्यात हार न मानता टिकवून राहण्यासाठी डबेवाल्यांची संघटना आणि ट्रस्ट विविध प्रयत्न देखील करत आहे.
कोरोनाकाळापासून डबेवाल्यांवर परिणाम
मुंबई सारख्या शहरात अनेक विविध भागांमध्ये कोरोनापूर्वी दोन लाख डबे हे डबेवाले पोहचवत होते, मात्र सध्या 40 ते 50 हजार डबे पोहोचवले जातात. पूर्वी मुंबईत 5000 डबे वाले होते, मात्र आता 1500 चं उरले आहेत. चाकरमान्यांना वेळेवर त्यांचा डबा पोहोचवणारे आणि जगात मॅनेजमेंटचे गुरू म्हणून स्थान असणारे मुंबईचे डबेवाले सध्याचा परिस्थितीत अडचणीत सापडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)