एक्स्प्लोर

Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक; वाहतुकीला पर्याय कोणता?

Mumbai Pune Expressway : आज (10 ऑक्टोबर) दुपारी 12 ते 2 दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

पुणे : जर तुम्ही मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरुन  (Mumbai - Pune Expressway)  तुम्ही प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज (10 ऑक्टोबर) दुपारी 12 ते 2 दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन हलक्या वाहनांसाठी शिंग्रोबा घाटातील वाहतूक सुरु राहणार आहे.  

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान आयटीएमएस प्रणालीच्या अनुषंगाने ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यात येणार आहे. याच गॅन्ट्रीवर सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले जाणार आहेत.  ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत km 45 व km 45/800 या ठिकाणी Gantry बसविण्यात येणार आहे. Gantry बसविताना सदर कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित केली जात आहे.

ITMC प्रकल्प राबवण्यात येणार...

अपघात आणि अपघाताची संख्या पाहता इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणीसाठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. 

ITMC सिस्टिम काय आहे?

आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम होय. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. वाहनं टेक्नॉलॉजीशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचं असेल, म्हणजेच वाहनात जीपीएससारखे सेन्सर लावले जातील. ब्लुटूथ आणि वाय-फायचा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होईल, जे हल्लीच्या वाहनात इन बिल्ड असतातच. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल. अशावेळी द्रुतगती मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहोचेल, संभाव्य धोका पाहता ते वाहनावर आधीच नियंत्रण आणू शकतात. अवजड वाहनं द्रुतगती मार्गावर पार्क असतील तर त्याचीही कल्पना सेन्सरमुळे मिळेल. अपघातानंतर घटनास्थळ क्षणार्धात लक्षात येईल आणि तातडीची मदतही पोहोचेल.

हे ही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget