एक्स्प्लोर
मुंबई मनपा नगरसेवकांचं 'प्रजा फाऊण्डेशन'कडून प्रगतिपुस्तक
'प्रजा फाऊण्डेशन'ने जाहीर केलेल्या मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या प्रगतिपुस्तकात शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी पहिला क्रमांक पटकावला.
मुंबई : मुंबई महापलिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचं प्रगतिपुस्तक 'प्रजा फाऊंडेशन'ने जाहीर केलं. मार्च 2017 ते मार्च 2018 या कालावधीतील नगरसेवकांच्या कामगिरीवर हे प्रगतीपुस्तक तयार करण्यात आलं आहे. यामध्ये शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी पहिला क्रमांक पटकावला. तर काँग्रेस पक्षाने सर्वात चांगली कामगिरी बजवल्याचं या रिपोर्टमध्ये जाहीर करण्यात आलं आहे.
सर्वोत्तम तीन नगरसेवक -
1. किशोरी पेडणेकर ( शिवसेना )
2. श्वेता कोरगावकर ( काँग्रेस )
3. प्रीती साटम ( भाजप )
निकृष्ट कामगिरी बजावणारे (अंतिम तीन ) नगरसेवक
1. शहनवाज खान ( एमआयएम )
2. केशरबेन पटेल ( भाजप )
3. गुलनाझ कुरेशी ( एमआयएम )
सर्वोत्तम तीन राजकीय पक्ष
1. काँग्रेस
2. भाजप
3. शिवसेना
या अहवालात डिसेंबर 2017 पर्यंत 37 नगरसेवकांची गुन्हेगारी पार्शवभूमी असल्याचं आढळलं. तर चार नगरसेवकांवर डिसेंबर 2017 पर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत.
2017-18 दरम्यान पुरुष नगरसेवकांनी सरासरी 60.44 टक्के, तर महिला नगरसेवकांनी सरासरी 59.02 टक्के गुण पटकावले
महापालिकेत रस्त्यावरील खड्डे, रस्त्यांची कामं, रस्ते, चौक, स्टेशन, इमारतीच्या नामकरणाविषयी सर्वाधिक प्रश्न विचारले गेले. मात्र महापालिकेत होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत नगरसेवकांनी त्या तुलनेत कमी प्रश्न विचारल्याचं चित्र आहे. या कालावधीत 13 नगरसेवकांनी एकही प्रश्न विचारलेला नाही.
प्रश्न न विचारणारे नगरसेवक
1. केशरबेन पटेल ( भाजप )
2. गुलनाज कुरेशी ( एमआयएम )
3. मुरजी पटेल ( भाजप )
4. जगदीश थैवलपील ( शिवसेना )
5. अनिता पांचाळ ( भाजप )
6. विनिफ्रेड डिसुझा ( काँग्रेस )
7. नायिजा सोफी ( राष्ट्रवादी )
8. रेश्माबानो खान ( काँग्रेस )
9. रेखा रामवंशी ( शिवसेना )
10. ऋतुजा तारी ( शिवसेना )
11. प्रीती पाटणकर ( शिवसेना )
12. सुप्रिया मोरे ( काँग्रेस )
13. मनिषा रहाटे ( राष्ट्रवादी )
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement