![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
प्रभादेवी पोलिसांचा राजकीय पक्षांना दणका; गोळीबार प्रकरणानंतर सेना, ठाकरे गट, मनसेला स्वागत मंडप उभारण्यास नकार
प्रभादेवी परिसरात याच कारणावरून राडा आणि गोळीबार (Prabhadevi Rada) झाला होता. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून यंदा या परिसरात स्वागत मंडप उभारण्याची परवानगीच देण्यात आलेली नाही.
![प्रभादेवी पोलिसांचा राजकीय पक्षांना दणका; गोळीबार प्रकरणानंतर सेना, ठाकरे गट, मनसेला स्वागत मंडप उभारण्यास नकार Mumbai Prabhadevi Police reject Shiv Sena Uddhav Thackeray MNS reques after Sada Sarvankar Shot Fire incident प्रभादेवी पोलिसांचा राजकीय पक्षांना दणका; गोळीबार प्रकरणानंतर सेना, ठाकरे गट, मनसेला स्वागत मंडप उभारण्यास नकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/4ffbf0600ba7216230684283b5a5fddb169475110441589_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गणेशोत्सवाच्या (Ganeshostav 2023) वेळी कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून प्रभादेवी पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे या तीनही पक्षांना स्वागत मंडप उभारण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. गेल्या वर्षी प्रभादेवी परिसरात याच कारणावरून राडा आणि गोळीबार (Prabhadevi Rada) झाला होता. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून यंदा प्रभादेवी परिसरात स्वागत मंडप उभारण्याची परवानगीच देण्यात आलेली नाही.
प्रभादेवी परिसरात मनसेने 12- 13 वर्षापूर्वी गणेशोत्सवाला सुरूवात केली. नंतर काही वर्षांनी सदा सरवणकर (Sada Sarvankar) आमदार झाल्यानंतर त्यांनी देखील य मंडपासमोर गणेशोत्सवाला सुरुवात केली होते. शिवसेना पक्षातून बंड करून एकनाथ शिंदे आणि 40 आमदार बाहेर पडले. शिंदे यांच्या बंडानंतर काही शिवसेनेत उभी फूट पडली. सदा सरवणकर हे शिंदेंच्या बंडात सहभागी होते. त्यामुळे शिवसेना उद्धव ठकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तिसरा मंडप उभारला. बंडामुळे आधीच वातावरण तापलेले असताना गणेशविसर्जनाच्या दिवशी दोन्ही गट आमनेसामने आले. त्यानंतर दोन्ही गटात वाद झाला, गोळीबार दाखल झाला त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये सदा सरवणकरांना क्लीन चीट देण्यात आली.
तिन्ही पक्षांकडून सध्या पर्यायी जागेचा शोध सुरू
यंदा पुन्हा तिन्ही पक्षांनी गणेशोत्सव काळात मंडप उभारण्याचे परवानगी मागणारे पत्र पोलिसांना दिली. परंतु गेल्या वर्षी घडलेला प्रकार लक्षात घेता पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत तिन्ही पक्षांना मंडप उभारण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांना तिथे गणेशोत्सव साजरा करत येणार आहे. तिन्ही पक्षांकडून सध्या पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. तिन्ही पक्षांना प्रभादेवी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र तिन्ही पक्ष त्याच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पाठपुरावा करत आहे.मात्र गेल्या वर्षीच्या प्रकारानंतर कोणालाही परवानगी देण्यात येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे
वादाचं नेमकं कारण काय?
गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेना ठाकरे गटाकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता. त्या दरम्यान, दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली. या वादाचे रुपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
हे ही वाचा :
Ganeshotsav 2023 : मुंबई पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी तयारी सुरु, एक लाख गणसेवक मदतीला, प्रत्येक मंडळात गणसेवकांची नियुक्ती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)