एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Ganeshotsav 2023 : मुंबई पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी तयारी सुरु, एक लाख गणसेवक मदतीला, प्रत्येक मंडळात गणसेवकांची नियुक्ती

Ganeshotsav 2023 : यंदा गणेशोत्सावदरम्यान पोलिसांच्या मदतीसाठी मुंबईतील प्रत्येक गणेश मंडळांमध्ये गणसेवक नियुक्त केले जाणार आहेत.

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) हा मुंबईतील (Mumbai) सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक समजला जातो. देशाभरातून लाखो गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात. या उत्सवादरम्यान कोणतीही अप्रिय आणि अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांद्वारे (Mumbai Police) खबरदारी घेतली जात आहे. यासाठी हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सावदरम्यान पोलिसांच्या मदतीसाठी मुंबईतील प्रत्येक गणेश मंडळांमध्ये गणसेवक (Gansevak) नियुक्त केले जाणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीसोबत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मोठ्या मंडळांमध्ये 20 आणि लहान मंडळांमध्ये 10 गणसेवकांची नियुक्ती

गणेशोत्सवात मुंबईमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांवरील ताण कमी व्हावा यासाठी एक लाख गणसेवकांची फौज बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून तयार करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून या गणसेवकांना पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात येईल. मुंबईचा गणेशोत्सव जोरदार साजरा व्हावा आणि हा उत्सव साजरा करताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अधिक सज्ज राहावे यासाठी समितीने हा प्रस्ताव मुंबई पोलिसांकडे ठेवला होता. पोलिसांनी समन्वय समितीच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला असून छोट्या गणेशोत्सव मंडळातील 10 तर मोठ्या गणेशोत्सव मंडळातील 20 असे मुंबईत एकूण एक लाख गणसेवक काम करतील. हे गणसेवक वेळोवेळी पोलिसांसोबत समन्वय करतील. 

पोलिसांवरील ताण कमी होण्याची अपेक्षा

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. या दहा दिवसांच्या उत्सवात गणेशभक्तांसह सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये तसंच पोलीस आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राहावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये लहान-मोठे हजारो गणेश मंडळं आहेत. या मंडळांमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. सोबतच गणपतीचा आगमन सोहळा आणि विसर्जन मिरवणुकीतही भक्तांची संख्या मोठी असते. अशा परिस्थितीत बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ल्याचा धोका असतो. त्यामुळे जवळपास एक लाख गणसेवकांची सेना पोलिसांच्या मदतीला असल्याने त्यांचा ताण काहीसा कमी होईल अशी अपेक्षा आहे.  

गणसेवकांना पोलिसांकडून ओळखपत्र

दरम्यान प्रत्येक गणेश मंडळात नियुक्त असलेल्या गणसेवकांना पोलिसांकडून ओळखपत्र देखील देण्यात येईल. जवळपास एक लाख गणसेवक आपापल्या मंडळाच्या मंडप आणि आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवतील. मंडपाजवळ कोणतंही संशयास्पद वाहन उभं असेल तर याची माहिती तातडीने पोलिसांना देतील.

हेही वाचा

Ganeshotsav 2023 : पर्यावरण पूरक आणि पीओपी गणेश मूर्तीमधील फरक कळण्यासाठी शिक्का मारण्याचा आदेश मागे, लोढांच्या पत्रानंतर बीएमसीचा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरतीMumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावलेAbu Azmi On BJP | वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीकाGulabRao Patil On Ladki Bahin Yojana | आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाही - गुलाबराव पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
Embed widget