एक्स्प्लोर

Republic Day 2020 | 88 वर्षांनी आज मुंबई पोलीसांचे अश्वदल दिसणार, मुंबईतील परेडमध्ये सामील होणार

स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईत पोलिसांकडे अश्वदल कार्यरत होतं. 1932 मध्ये हे दल बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर आता 26 जानेवारीच्यानिमित्ताने आज शिवाजी पार्क येथे हे अश्वदल सहभागी होणार आहे.

मुंबई : सध्याच्या पिढीनं केवळ सिनेमात पाहिलेलं पोलीस दलातील अश्वदल आता खरोखर मुंबईत पाहता येणार आहे. तब्बला 88 वर्षांनी पुन्हा एकदा मुंबईच्या सरक्षेसाठी पोलिसांचं अश्वदल गस्त घालणार आहेत. वाहतूकीच्या नियमांचं उल्लघंन करणाऱ्यांसाठी याचा वापर होणार आहे. 26 जानेवारीच्यानिमित्ताने आज शिवाजी पार्क येथे हे अश्वदल सहभागी होणार आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदा घोड्यावरस्वार असलेले मुंबई पोलीस आपल्याला पाहायला मिळणार आहे. देशात सध्या गुजरात, चेन्नई, हैदराबाद, केरळ, कर्नाटकातील पोलिस दलात घोड्यांचा वापर केला जातो. 26 जानेवारीच्यानिमित्ताने हे युनिट पुन्हा एकदा कार्यरत होणार आहे. या दलामध्ये 30 घोडे असणार आहेत. सध्या मुंबई पोलिसांनी 13 घोडे विकत घेतले असून अजून 17 घोडे विकत घेण्याचा प्रस्ताव आहे. 26 जानेवारी रोजी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या संचलनात 11 घोडे सहभागी होणार आहेत. घोड्यावर बसल्याने उंचीवरुन जमावावर लक्ष ठेवता येते. त्यामुळे आंदोलन, जमाव नियंत्रित करण्यासाठी हे अश्वदल महत्वाचं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. घोड्यावरून येणारे पोलीस हे आंदोलनाच्या ठिकाणी लाठीचार्ज करणार नाहीत. मात्र घोडे आले की गर्दी आपोआप बाजूला होते, हे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. Mumbai Police | मुंबई पोलिस दलाचं अश्वदल लवकरच कार्यरत होणार | ABP Majha या अश्वदलात एक पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, चार हेड कॉन्स्टेबल, 32 कॉन्स्टेबल असणार आहेत. या घोड्यावरील घोडेस्वारांना वाकिटॉकी देण्यात येणार असून समुद्र किनारी दोन घोडे ठेवण्याचा मुंबई पोलिसांचा मानस आहे. मरोळ येथे या घोड्यांना ठेवण्यासाठी पागा तयार करण्यात येणार आहे. सध्या त्यांची तात्पुरती व्यवस्था शिवाजी पार्क येथे करण्यात येणार आहे. मरोळ येथील पोलीस मैदानावर घोडेस्वारांचं प्रशिक्षण अन्य सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आपत्कालीन स्थितीमध्ये तसेच एखाद्या कार्यक्रमामध्ये जमलेल्या गर्दीवर नजर ठेवणे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे अशा कामांसाठी अश्वदलाचा नक्कीच जास्त उपयोग होईल. याशिवाय मुंबई पोलिसांचं हे अश्वदल येत्या काळात मुंबईकरांचा आकर्षणही ठरु शकतं.

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Mumbai KEM Hospital : तुकाराम मुंढेंनी वात पेटवली, आता आरोग्य समितीच्या अध्यक्षांची केईएम रुग्णालयात अचानक धाड, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंनी वात पेटवली, आता आरोग्य समितीच्या अध्यक्षांची केईएम रुग्णालयात अचानक धाड, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
Embed widget