Mumbai Police: होळीच्या रंगात वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्या 73 तळीरामांवर पोलिसांची कारवाई
Drink And Drive Case: मुंबई वाहतूक पोलिसांनी आज मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या सुमारे 65 दुचाकी आणि आठ चारचाकी वाहनचालकांना पकडले.
Mumbai Traffic Police: मुंबईत तब्बल दोन वर्षांनंतर होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबईत वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. शिवाय दारू पिऊन वाहने चालू नये असे देखील आवाहन केले होते. मात्र यानंतरही मुंबईत मोठ्या प्रमाणावर तळीराम वाहन चालवताना आढळून आले. मुंबई वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल 65 दुचाकी चालक आणि 8 चार चाकी वाहन चालक तळीरामांवर कारवाई (Drink And Drive Case) केली आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी आज मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या सुमारे 65 दुचाकी आणि 8 चारचाकी वाहनचालकांना पकडले. या सर्वांवर मोटार वाहन कायद्याच्या ड्रंक अँड ड्राईव्ह कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत वाहने चालवताना होणारा अपघात टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाके बंदिस्त ठेवण्यात आले होते.
Drink And Drive Case : ड्रंक अँड ड्राइव्ह
- दोन चाकी - 65.
- चार चाकी - 8.
Mumbai Traffic Police: मुंबईत होळीचा सण उत्साहात, मात्र वाहतूक मंदावली
मुंबईत यंदा होळीचा मोठा उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी होळीच्या रंगांची उधळण केली जात असल्याचं दिसून आलं. आता संध्याकाळनंतरही लोक सण साजरा करण्यासाठी घराबाहेर पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ठिकठिकाणची वाहतूक मंदावली आहे. होळी साजरी करण्यासाठी जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणात लोक जमले असल्याने तेथील वाहतूक मंदावली आहे अशी माहिती आहे. त्यामुळे या बाजूला प्रवास करताना नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
Due to people in large number have gathered at Juhu chowpaty to celebrate holi, the traffic there is slow down.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) March 7, 2023
होळी साजरी करण्यासाठी जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणात लोक जमले असल्याने तेथील वाहतूक मंदावली आहे. #MTPUpdates
या आधी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या 156 तळीरामांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) कारवाई केली होती. दारू प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन मुंबई पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह (Drink And Drive) करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता. त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली होती.
ही बातमी वाचा: