(Source: Poll of Polls)
Devendra Fadanvis: आमच्या मित्राला कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली होती... देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
नशा करायचाच असेल तर तो कामाचा करावा, भक्तीचा करावा असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला.
मुंबई: आज धुळवडीच्या दिवशी विरोधकांना माफ केलं असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलं. आमच्या मित्राला कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली होती त्यामुळे कोणी रडत होतं, कुणी गात होतं असंही ते म्हणाले. राज्याचं बजेट सर्वसमावेशक असेल, त्यामध्ये सर्व रंग दिसतील असं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे काही मित्र आहेत त्यांना खोटं सांगून कुणीतरी भांग पाजली होती. त्यानंतर कुणी गाणं गात होतं, कुणी रडत होतं. असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा नशा, संगीताची नशा करावी, कामाची नशा करावी. आम्ही विधानसभेमध्ये सांगितलं होतं की या सर्वाचा आम्ही बदला घेणार, आता या होळीच्या दिवशी सर्व विरोधकांना आम्ही माफ केलं, विरोधकांच्याबद्दल आमच्या मनामध्ये कोणतीही कटुता नाही, हाच आमचा बदला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा टोला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावल्याचं बोललं जातंय. दरम्यान आम्ही त्यांना माफ केलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजपमधील कटुता संपणार का? या दोघांच्या दरम्यान संवादाची दारं पुन्हा खुली होणार का याचीही चर्चा आहे.
दहा महिलांचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान करणार
जागतिक महिला दिनी गेट वे ऑफ इडियावर लाईट्स अँड साउंड शो करण्यात येणार आहे. राज्यासाठी ज्या महिलांचे योगदान राहिले त्यांची कामगिरी दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान काही महिलांचाही सन्मान करण्यात येणार असल्याचं राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं. यावेळी 26/11 च्या हल्ल्यावेळी ज्या नर्सने धाडसी कामगिरी बजावली होती त्या महिलेचादेखील सन्मान केला जाईल. या कार्यक्रमात 10 महिलांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार दिला जाणार आहे.
महिला धोरणाबाबत बजेटमध्ये देखील तरतूद असणार आहे. महिलांसाठी चालते-फिरते जिम, चालती-फिरते वाचनालय, आपण सुरू करत आहोत. चालती-फिरती व्यायामशाळा मुंबईतील 15 वॉर्डमध्ये सुरु करण्यात येणार आहे.
Maharashtra Budget : बजेट सर्वसमावेशक असेल
राज्याच्या बजेटमध्ये सर्व रंग दिसतील, बजेट सर्वसमावेशक असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे, या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार नक्कीच उभे राहील असंही ते म्हणाले.
मला फक्त एक-दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे, काही लोक 365 दिवस शिमगा करतात, मात्र एखादा दिवस सोडून 364 दिवस सभ्य लोकांसारखे वागावे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टोला लगावला.
ही बातमी वाचा: