एक्स्प्लोर
CCTV : विमान कोसळतानाचा व्हिडीओ 'माझा'च्या हाती
ज्या इमारतीजवळ विमान कोसळलं, त्याच इमारतीच्या मालकाने सीसीटीव्ही बसवला होता. त्यामध्येच विमान कोसळतानाचा थरार रेकॉर्ड झाला आहे.
मुंबई: घाटकोपर विमान दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. ज्या इमारतीजवळ विमान कोसळलं, त्याच इमारतीच्या मालकाने सीसीटीव्ही बसवला होता. त्यामध्येच विमान कोसळतानाचा थरार रेकॉर्ड झाला आहे.
सर्वकाही सुरळीत चाललं असताना अचानक विमान आलं, कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. हे सर्व या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.
स्फोटानंतर आगीचा भडका आणि ज्वाळा या व्हिडीओत दिसतात.
विमान कोसळलं
घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात 28 जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास चार्टर्ड विमान कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील चार जण आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या विमानात पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला.
पायलट मारिया झुबेरी, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे यांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.
चाचणीसाठी दुपारी दीडच्या सुमारास जुहू हेलिपॅडवरुन या विमानाने उड्डाण केलं. मात्र घाटकोपरपर्यंत पोहोचताच दुर्घटनाग्रस्त झालं आणि भर वस्तीत कोसळलं.
हे विमान उत्तर प्रदेश सरकारचं होतं. या विमानाला अलाहाबादमध्ये 2013 मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने हे विमान 2014 मध्ये मुंबईतील यूव्हाय एव्हिएशनला विकलं होतं. या कंपनीने अलाहाबादमधील अपघातामुळे विमानाला झालेला बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान उड्डाणासाठी पूर्णत: सज्ज आहे का हे तपासण्यासाठी चाचणी घेण्यात येत होती. त्यावेळी विमान दुर्घटनाग्रस्त झालं.
संबंधित बातम्या
मुंबईत भर वस्तीत विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू
जुहूवरुन उड्डाण ते घाटकोपरमध्ये विमान कोसळलं, नेमकं काय घडलं?
घाटकोपर दुर्घटनेतलं आणि मुख्यमंत्र्यांचं 'ते' हेलिकॉप्टकर एकाच कंपनीचं
खराब वातावरणातही चाचणी करायला लावली, मारियांच्या पतीचा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement