एक्स्प्लोर
13 वर्षीय मुलगी 27 आठवड्यांची प्रेग्नंट, गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टात
थायरॉईडमुळे लेकीचं वजन वाढत असल्याचं संशय पालकांना होता. डॉक्टरांनी त्यांना मुलीची सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये मुलगी साडेसहा महिन्यांची प्रेग्नंट असल्याचं समजलं.
मुंबई : 13 वर्षांच्या मुलीचं वजन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आई-बाबा तिला चेकअपसाठी दवाखान्यात घेऊन गेले, मात्र त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या निदानामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. संबंधित मुलगी साडेसहा महिन्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
हा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या चारकोप परिसरात घडला आहे. पालकांनी मुलीला तपासणीसाठी दवाखान्यात नेलं. थायरॉईडमुळे लेकीचं वजन वाढत असल्याचं संशय पालकांना होता. डॉक्टरांनी त्यांना मुलीची सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये मुलगी साडेसहा महिन्यांची प्रेग्नंट असल्याचं समजलं.
मुलीला याबाबत काहीच कल्पना नसल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसात तक्रार केल्यावर अज्ञाताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरवर्षी 15 वर्षांखालील 200 हून अधिक मुलींचे गर्भपात केले जातात. मात्र गर्भ 20 आठवड्यांच्या आतील असेल तरच गर्भपाताला परवानगी आहे. परंतु पीडित मुलगी ही 27 आठवडयांची प्रेग्नंट असल्यानं तिच्या जीवाला धोका निर्माण होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं.
मुलीच्या गर्भपातासाठी तिचे पालक डॉक्टरांच्या मदतीने सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement