मुंबईत दुकानांच्या अमराठी पाट्यांवर लवकरच कारवाई; नेमकी कशी होणार कारवाई?
BMC action against Non Marathi Board on Shops : मराठी नामफलकांच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने तयारी सुरु केली आहे. मुंबईत सुमारे साडेचार लाख दुकाने पालिकेच्या रडारवर आहेत.

Mumbai News Latest Updates : राज्यात सध्या भोंग्यांवर कारवाईचे राजकारण सुरु असताना मुंबईत दुकानांच्या अमराठी पाट्यांवर लवकरच कारवाई सुरु होणार आहे. मराठी नामफलकांच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने तयारी सुरु केली आहे. मुंबईत सुमारे साडेचार लाख दुकाने पालिकेच्या रडारवर आहेत. दुकानांवर ठळक मराठीत नामफलक बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरु केली जाणार आहे.
दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकांवर सुरुवातीला मराठी भाषेत, देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्याही भाषेत नाव लिहिले जाणार असेल, तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या आणि ठळक अक्षरांतच असले पाहिजे याबाबतचा शासन निर्णय 17 मार्च 2022 रोजी जारी करण्यात आला.
महिन्याभरापूर्वी महापालिकेनं परिपत्रक काढून मुंबईतील दुकाने- आस्थापनांना नामफलक मराठीत रुपांतरीत करण्याविषयी आवाहन केले होते.
अमराठी पाट्यांवर अशी होणार कारवाई
पहिल्या टप्प्यात दुकानांची पाहणी करण्यात येणार असून मराठी नामफलक बंधनकारक असल्याबाबत दुकानदार व आस्थापना यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास दुकाने व अस्थापना कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल
नामफलक मराठीत नसल्यास पालिका कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
नोटिशीनंतरही नामफलकात बदल न केल्यास न्यायालयाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होईल,
तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे असू नयेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
