एक्स्प्लोर
अन् आकाशने नीता अंबानींच्या हातातून बायकोचा हात सोडवला!
पण नीता अंबानी काही केल्या आपल्या लेकाचा हात सोडायला कबूल नव्हत्या.

मुंबई : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती नीता आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि श्लोका मेहताच्या साखरपुड्याची. या साखरपुड्याच्या सेलिब्रेशनसाठी उद्योग, बॉलिवूडपासून अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. आकाश आणि श्लोकाचे फोटो काढण्यासाठी मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पण दरम्यान नीता अंबानी, आकाश आणि श्लोका यांच्यात घडलेल्या एका प्रसंगाची चर्चा जास्तच रंगली. तर झालं असं की, नीता अंबानी आकाश आणि श्लोकासोबत मीडियासमोर आल्या. त्यावेळी ईशा आणि अनंतही सोबत होते. सगळ्यांचा फोटो काढल्यानंतर मीडियाला आकाश आणि श्लोकाचा सेपरेट कपल फोटो हवा होता. यासाठी प्रतिनिधी आकाश आणि श्लोकाकडे विनंती करत होते. पण नीता अंबानी काही केल्या आपल्या लेकाचा हात सोडायला कबूल नव्हत्या. आकाश बाजूला झाल्यावर त्यांनी आपल्या सुनेचाच म्हणजे श्लोकाचा हात गच्च पकडून ठेवला. एकीकडे मीडियाचं फोटोसाठी बोलावणं आणि दुसरीकडे आईचा कपल फोटोसाठी नकार. काय करावं आकाशला काही कळेना. मग आकाशने सरळ आईचा हात बाजूला सारला आणि श्लोकासोबत कपल पोझ दिली. मीडियासमोर घडलेल्या या प्रसंगाची सध्या जोरदार चर्चा आहे. पाहा व्हिडीओ
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















