एक्स्प्लोर
BMC | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिका 'अॅक्शन प्लॅन' तयार करणार
मुंबईतील वाढता कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका अॅक्शन प्लॅन तयार करणार आहे.
मुंबई : देशातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण एकट्या मुंबई शहरात आहेत. वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या सर्वांच्याच डोकेदुखीचा विषय झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिका 'अॅक्शन प्लॅन' तयार करणार आहे. यासाठी पालिका गटनेत्यांची बैठक पार पडली. यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. या बैठकीत खासगी रुग्णालयांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिका गटनेत्यांच्या बैठकीतील निर्णय
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई होणार. रुग्णालयातील बेड फुल झाले आहेत, अशी चुकीची माहिती देत रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश.
- पालिकेच्या नियमानुसार, खासगी रुग्णालयात गरिबांसाठी 20 टक्के खाटा राखून ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, आधीच खाटा रुग्णांमुळे फूल असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यामुळे खासगी रुग्णालयात यापुढे पालिकेतील एका अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर काही खासगी रुग्णालये बंद करण्यात आली आहेत. ती सुरू करण्याच्या सूचना देऊनही बंद आहेत. अशा खासगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आलेत.
- रुग्णालयांबाहेर पुरेशा रुग्णवाहिका असाव्यात तसेच क्वॉरंटाईन आणि प्रतिबंधित क्षेत्राची माहिती वेळोवेळी गटनेत्यांना द्यावी, अशी सूचनाही केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement