एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची उचलबांगडी; इक्बाल चहल नवे आयुक्त
मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागेवर इक्बाल चहल यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची अखेर बदली करण्यात आली. मुंबईत रुग्णसंख्या आवरत नसल्याने कारवाई केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नगरविकासमध्ये अतिरिक्त मुख्य सचिवपदी परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. तर, इक्बाल चहल यांना मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. चहल हे सध्या नगरविकासमध्ये प्रधान सचिव पदावर कार्यरत होते.
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यात मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. ही वाढ रोखण्यास असमर्थ ठरत असल्याच्या कारणामुळे प्रवीण परदेशी यांची बदली केल्याची सुत्रांची माहिती आहे.
प्रवीण परदेशी यांची कार्यकीर्द
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.
- अजोय मेहता यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदी वर्णी लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीच परदेशी याना मुंबई महापालिकेची जबाबदारी सोपवली.
- राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आणि विशेषतः कोरोना पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित होत होते.
- मुख्य सचिव अजोय मेहता आणि महापालिका आयुक्त यांच्यातील शीतयुद्ध वारंवार दिसत होतं.
- एकीकडे मुंबईतील वाढती कोरोना बाधित रुग्णांची संळ्या, रुग्णालयात ढासळलेली अवस्था, केंद्राकडूम पाहणी करणारे पथक यामुळे परदेशी यांच्याबाबत चर्चा सुरू झाली होती.
- केंद्राचे पथक काल गुरुवारी पुन्हा एकदा मुंबईत आले असताना परदेशी यांच्या बदलीच्या चर्चेला सुरुवात झाली आणि आज अखेरीस त्यांची बदली झाली.
- मुख्य सचिव अजोय मेहता हे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून पाहिले जातात.
- या दोघांमधील फटका देखील परदेशी यांना बसला असल्याचे बोलले जात आहे.
का झाली परदेशी यांची बदली?
- अजोय मेहता आणि प्रविण परदेशी यांच्यात शीतयुद्ध सुरु होतं, दोघांमध्ये बैठकीत उडायचे खटके.
- मुंबईतला आकडा वाढत असताना तो रोखण्यात अपयशी
- प्रविण परदेशी यांच्या अनेक तक्रारी वारंवार होत होत्या
- रुग्णालय आणि अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचा आरोप होता
- कोरोनाच्या काळात टेन्डर प्रक्रियेवरूनही अतंर्गत गोंधळ निर्माण झाला होता
- प्रविण परदेशी आपतकालिन परिस्थिती हाताळण्याची चांगल्या हातोटीसाठी ओळखले जातात. मात्र, कोरोनाच्या संकटकाळात मुंबईत रुग्णसंख्यावाढ रोखण्यात त्यांना अपयश आलं.
- प्रविण परदेशींनी राज्यशासनानं घेतलेल्या काही निर्णयात स्वत:च्या अधिकारात फेरबदल केले होते.
- लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दिलेली शिथीलता प्रविण परदेशींनी मुंबई करता रद्द केली. अनावश्यक सुविधांची दुकाने खुली न करण्याचे आदेश काढले.
- मात्र, दुसऱ्याच दिवशी पुन्हा इलेक्ट्रॉनिक-हार्डवेअरची दुकाने खुली ठेवण्याचे आदेश दिले.
- आधी 50% आवश्यक असणारी महापालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती 100% अनिवार्य केली. त्यानंतर पुन्हा नवा आदेश काढून 75% केली.
- भाजी बाजारांबाबतचे नियोजन आणि आराखडे चुकले
- वॉर्डनिहाय रुग्णांच्या आकडेवारीत महापालिकेकडून बराचसा गोंधळ होत होता. राज्य शासन आणि मुंबई महापालिका दररोज रुग्णांचे वेगवेगळे आकडे समोर आणत होती. यातही समन्वय नव्हता.
- मुंबई महापालिका प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या क्वारंटाईन सुविधांबाबत तक्रारी होत्या.
- मुंबईत रुग्ण वाढत आहेत. मात्र, हॉस्पिटलमध्ये पुरेसे बेड नाहीत. इथुन पुढे असाच असमन्वय राहीला तर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.
- महापालिका प्रशासनाकडून नियोजनाची अंमलबजावणी कठोरपणे होत नव्हती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement