एक्स्प्लोर
मुंबई महापालिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरणार
![मुंबई महापालिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरणार Mumbai Municipal Corporation For The Prime Minister S Field मुंबई महापालिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/03/21073514/Narendra_Modi_PM_Wave_AFP_650x488-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर पक्षाने आता मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली आहे. पक्षाच्या प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीच मुंबईत सभा घेणार असल्याची माहिती भाजपच्या जल्लोष रॅलीत आमदार योगेश सागर यांनी दिली.
नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रदेश भाजपचे अभिनंदन केले. या निवडणुकीत भाजपने 22 नगरपालिकांवर पक्षाचा झेंडा फडकवला. तसेच 52 नगरपालिकांमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासात आणखी भर घालण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी पक्षाने शिवसेनेसोबत युती करुन निवडणूक लढवायची की, स्वबळावर निवडणूक लढवायची याबाबत अजूनही चित्र अस्पष्ट आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी यापूर्वीच मुंबई महापालिकेत भाजप स्वबळावर लढणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. याशिवाय मुंबई भाजप अध्यक्ष अशिष शेलार यांनीही वेळोवेळी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. दुसरीकडे शिवसेनेचे नेतेही विविध व्यासपीठांवरुन सत्तेत राहूनही सरकारवर टीकेची झोड उठवतात.
शिवसेना पक्षनेतृत्वानेही युती होण्याबाबत अद्याप चित्र अस्पष्ट असल्याची प्रतिक्रिया विविध सभांमधून व्यक्त केली होती. तसेच मुंबई महापालिकेतील विविध उपक्रमांचे उद्घाटन शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना टाळून केल्याने युतीमध्ये सर्व काही अलबेल नाही असे दाखवून दिले होते. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर थेट पंतप्रधांनांच्या हस्ते विविध उपक्रमांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करुन घेऊन, भाजप प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)