एक्स्प्लोर

मुंबई पालिका कर्मचारी वाघांची देखभाल करु शकतात, पेंग्विनची का नाही?, नितेश राणेंचं महापौरांना पत्र

पेंग्विन देखभालीचा 15 कोटींचा खर्च कोणासाठी? कोणत्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होते? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकरांना नितेश राणे यांनी पत्रातून केला आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी जर वाघांची देखभाल करु शकतात, तर पेंग्विनची का नाही? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलाय. नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी पेंग्विन देखभालीचा 15 कोटींचा खर्च कोणासाठी? असा सवालही त्यांनी महापौरांना केला आहे. कोणत्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होते? असा प्रश्न उपस्थित करत, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. 

नितेश राणे यांनी पत्रात म्हटलंय की, "आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीनं आपण मुंबईकरांची दिशाभूल केली आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. असो. आम्हीही समजू शकतो की, पेंग्वीनच्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. महापालिकेने प्रकाशीत केलेल्या आकडेवारीप्रमाणे पर्यटकांची संख्या 2017 ते 2018 या आर्थिक वर्षात 17 हजार 57 हजार 059 होती. पण मागील दोन वर्षामध्ये पर्यटकांचा आकडा कमी झाला. आता ती संख्या 10 लाख 66 हजार 036 वर आलीय. त्यामुळे तीन वर्षात सात लाख पर्यटकांची संख्या घटलेली आहे."

आपल्या पत्रात पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, "मुळात महसूल वाढला म्हणून आकर्षण वाढले, असा भ्रमीत करण्याचा प्रयत्न आपण केला. पण वास्तवामध्ये 2010 पर्यंत या राणीबागेतील प्रवेश शुल्क हे 5 रुपये होते. पण त्यानंतर हे शुल्क आपण 5 रूपयावरून थेट 50 रुपयांवर नेलं. दोन प्रौढ आणि बारा वर्षाखाली दोन मुले आदीसाठी 100 रुपये आणि एका प्रौढ व्यक्तीला 50 रुपये अशाप्रकारचे अजब शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे जो महसूल वाढलेला आहे, तो या वाढीव शुल्कामुळे आहे पर्यटकांची संख्या किंवा आकर्षण वाढल्यानी नाही."

"एवढंच नाही तर शक्ती आणि करिष्मा ही वाघाची जोडीही आकर्षण असल्याचे आपण सांगितलत पण जर वाघाची देखभाल महापालिका कर्मचारी स्वतः करू शकतात तर पेंग्वीनची का नाही हा पंधरा कोटीचा पैरवीन देखभालीचा ठेका कोणासाठी?राणीचा बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करून जाण्याचे ठिकाण होते. पण एका पेंग्वीन च्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतले.", असंही नितेश राणे म्हणाले. 

"इतकेच नाही तर लहान मुलांना पाहता यावं म्हणून हा पेंग्विन कक्ष बनवला पण मुंबईतील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करताना राणीबागचे दरवाजे मुलांसाठी खुले केले गेले नाहीत, मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय? हे तरी सांगा.", असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job majha : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात नोकरीची संधी, अटी काय?Sunil Tatkare PC | वाल्मिक कराड अजित पवारांच्या कारमध्ये होता का? सुनील तटकरे म्हणाले...Chhagan Bhujbal : माझ्यासाठी कुणाचं तरी मंत्रीपद काढून घेणं मला पटत नाही : छगन भुजबळLadki Bahin Verification : लाडकी बहीण अर्जाची पडताळणी होणार, अपात्र बहिणींचं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Chhagan Bhujbal : तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी मांडत छगन भुजबळांचं मंत्रिपदाच्या चर्चेवर भाष्य
कुणाचं काढून मला मंत्रिपद नकोय, विदेशातून नाशिकमध्ये येताच छगन भुजबळांकडून भूमिका स्पष्ट
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Embed widget