एक्स्प्लोर
शिवाजी पार्कवरील तिन्ही पक्षांची सेल्फी पॉईंटची परवानगी रद्द
मुंबई : शिवाजी पार्कवर सेल्फी पॉईंटसाठी शिवसेना, भाजप आणि मनसेला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर महापालिकेकडून ही परवानगी रद्द केली आहे.
मुंबईतल्या दादर भागातील शिवाजी पार्कमध्ये असलेला सेल्फी पॉईंट तरुणांसह सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्र होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून यावरुन शिवसेना, मनसे आणि भाजपकडून जोरदार राजकारण सुरु होतं.सुरुवातीला मनसेने हा सेल्फी पॉईंट बंद करण्याची घोषणा केल्यानंतर, तो आणखी आकर्षक करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटर करुन, नव्या वादाला तोंड फोडलं. विशेष म्हणजे, भाजपनं यासाठी महापालिकेकडून परवानगीही मिळवली होती.
तर दुसरीकडे शिवसेनेनंही सेल्फी पॉईंटची जबाबदारी स्वीकारत मोठमोठे होर्डिंग्स शिवाजी पार्कात लावले. शिवाय यापुढे नवीन कलाकृतीसह आपण सेल्फी पॉईंट सुशोभित करत असल्याचं सेना नगरसेविका विशाखा राऊत यांनी फलकाच्या माध्यमातून सांगितलं. त्यामुळे मनसेने स्वत: च सेल्फी पॉईंट बंद करण्याची घोषणा करुन गोची झाली होती
त्यानंतर मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी काल आक्रमक पवित्रा घेत शिवाजी पार्कवरील वॉर्ड ऑफिसरच्या कार्यालयात धाव घेतली. तसेच शिवसेना आणि भाजपला एकाच दिवसात परवानगी दिलीच कशी, असा सवाल उपस्थीत करुन वॉर्ड ऑफिसरला धारेवर धरलं.
त्यामुळे सेल्फी पॉईंटवरुन सुरु झालेल्या राजकारणाला आता स्थानिकांचा विरोध होऊ लागला आहे. स्थानिकांनी सेल्फी पॉईंट बंद करण्याची मागणी करत वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढला. तसेच आपलं निषेधाचं पत्रही वॉर्ड ऑफिसरना दिलं. त्यानंतर मनपानेही यावर तत्काळ कृती करत सेल्फी पॉईंट रद्द करण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या
सेल्फी पॉईंटवरुन 'सेल्फी'श राजकारण, सेना-मनसे-भाजपची रस्सीखेच
मुंबईत मनसेनं बंद केलेला सेल्फी पॉईंट भाजप सुरु करणार!
मुंबईमधील शिवाजी पार्कातील ‘सेल्फी पॉईंट’ बंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement