(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Metro New Timings : आता उशिरापर्यंत करता येणार मेट्रोप्रवास, घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोचं नवं वेळापत्रक जाहीर
Mumbai Metro New Timings : मुंबईमधील सर्वात पहिली मेट्रो म्हणजे घाटकोपर ते वर्सोवा आता आधीपेक्षा अधिक उशीरापर्यंत धावणार आहे. नुकतंच मुंबई मेट्रोने नवं ट्वीट केलं आहे.
Mumbai Metro New Timings : मुंबईत हळूहळू मेट्रोचं(Mumbai Metro) जाळं पसरत असून सर्वात पहिली सुरु झालेली मेट्रो म्हणजे घाटकोपर ते वर्सोवा (Ghatkopar Versova Metro). या मेट्रोने दिवसभरात लाखो प्रवासी प्रवास करतात. पण अनेकदा रात्री उशीरापर्यंत मेट्रो (Metro Timings) सुरु नसल्याने अनेकांना अडचणी येतात. पण आता मेट्रोची वेळ वाढवण्यात आल्यामुळे मुंबईकरांना आणखी उशीरापर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार (Mumbai Metro New Timings) वर्सोवावरुन सुटणारी शेवटची मेट्रो रात्री 11 वाजता असणार असून घाटकोपरवरुन शेवटची मेट्रो आता 11 वाजून 25 मिनिटांनी सुटणार आहे. तर दोन्ही स्थानकांवरुन सकाळी सुटणारी पहिली मेट्रो 6 वाजून 30 मिनिटांनीच सुटणार आहे. मुंबई मेट्रोने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
मुंबई मेट्रोचं नवं वेळापत्रक
स्थानक | पहिली मेट्रो | शेवटची मेट्रो |
घाटकोपर | सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी | रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी |
वर्सोवा | सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी | रात्री 11 वाजता |
याआधी घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो वेळापत्रकाचा विचार करता सकाळी दोन्ही स्थानकांवरुन सुटणारी मेट्रो सकाळी 6 वाजून 30 मिनिटांचीच होती. पण वर्सोवावरुन 10 वाजून 30 मिनिटांनी शेवटची मेट्रो सुटत होती, तर घाटकोपरवरुन 10 वाजून 55 मिनिटांनी शेवटती मेट्रो होती. आता या दोन्ही वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. याआधी 16 ऑक्टोबर, 2021 रोजी शेवटचा वेळापत्रकात बदल करण्यात आला होता.
हे ही वाचा -
- Pune Metro : काय म्हणता? पहिल्याच दिवशी 7 तासात तब्बल 22 हजार पुणेकरांचा मेट्रो प्रवास
- ओला उबरसारख्या ॲप टॅक्सी कंपन्यांना हायकोर्टाचा निर्वाणीचा इशारा
- Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्येत आणखी घट, 38 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha