एक्स्प्लोर

Pune Metro : काय म्हणता? पहिल्याच दिवशी 7 तासात तब्बल 22 हजार पुणेकरांचा मेट्रो प्रवास 

Pune Metro :पंतप्रधान मोदींनी (PM Modi) पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे. उद्घाटनानंतरच्या काही तासातच तब्बल बावीस हजार 437 पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे

Pune Metro : काल मोठ्या दिमाखात पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सर्वसामान्य पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे. त्यानंतर उद्घाटन झाल्यानंतरच्या काही तासातच तब्बल बावीस हजार 437 पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे. यामध्ये मोबाईल तिकीट काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर दुपारी तीन वाजता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो व्यावसायिक तत्वावर सुरू करण्यात आल्या. त्यानंतर रात्री दहा पर्यंत या फेर्‍या सुरू होत्या.

उद्घाटनानंतर नंतर काही तासात वनाज ते गरवारे या मार्गावर 15842 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर 4616 नागरिकांनी प्रवास केला आहे. रविवारी एकूण 22437 नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. यामध्ये 1979 प्रवाशांनी मोबाईलवरुन तिकीट काढले तर बाकीच्यांनी काऊंटरवरुन तिकीट खरेदी केले असल्याची माहिती आहे. 

पंतप्रधानांनीही तिकीट काढून प्रवास केला

काल उद्घाटनाच्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: तिकीट काढून गरवारे स्टेशन ते आनंदवाडीपर्यंतचा प्रवास केला. मेट्रो उद्घाटन कार्यक्रमानंतर बोलताना पंतप्रधानांनी म्हटलं होतं की, आधी भूमिपूजन व्हायचं मात्र उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो लोकार्पणात लगावला. सध्याच्या काळात भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे दाखवले असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं..  समाजातील सर्वच घटकांनी आता मेट्रोचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले होते. 

सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार

सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे.  पुण्यात वनाझ ते रामवाडी दरम्यान पाच मेट्रो स्टेशनचे उद्घाटन झाले. मेट्रोने प्रवास करताना पहिल्या तीन स्टेशनसाठी दहा रुपये मोजावे लागतील तर पुढच्या दोन स्टेशनपर्यंत देखील प्रवास करायचा असेल तर आणखी दहा रुपये मोजावे लागतील. म्हणजे वनाझच्या पहिल्या स्टेशनपासून गरवारेच्या पाचव्या स्टेशनपर्यंत प्रवास करण्यासाठी वीस रुपये मोजावे लागतील. 

दोन्ही मेट्रो तीन डब्यांच्या असणार 

पिंपरी- ते फुगेवाडी या सात किलोमीटरच्या मार्गासाठी देखील वीस रुपये तिकीट असेल. सध्या या दोन्ही मेट्रो तीन डब्यांच्या असणार आहेत आणि प्रत्येक डब्यात 325 प्रवाश्यांना प्रवास करण्याची क्षमता असणार आहे. तीन डब्यांमधील एक डबा महिलांसाठी राखीव असणार आहे.

संबंधित बातम्या: 

 

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Pune Water Cut: वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
NCP Pune Mahangarpalika: मोठी बातमी: पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget