Mumbai Metro News: मोठी बातमी: घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प, तीन-चार तास वाहतूक बंद राहणार?
Ghatkoper Versova Metro Train: मोठी बातमी: घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली होती. तीन-चार तास वाहतूक बंद राहणार, असे सांगितले जात होते. मात्र, बिघाड तातडीने दुरुस्त

Mumbai News: मुंबईतील पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असणारी मुंबई मेट्रो-1 ची सेवा सोमवारी दुपारी ठप्प झाली. आझाद नगर रेल्वे स्थानकात ताडपत्री ओव्हरहेडमध्ये (Overhead Wire) अडकल्याने हा तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे घाटकोपरहून वर्सोव्याच्या (Ghatkoper Versova Metro Train) दिशेने जाणारी मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. गेल्या अर्ध्या तासापासून विविध रेल्वे स्थानकांवर घाटकोपरहून वर्सोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रो ट्रेन थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांना आता ज्या मेट्रो स्थानकात गाडी थांबली आहे, तिथे उतरुन रस्तेमार्गे पुढील प्रवास करावा लागत आहे.
आझाद नगर येथे मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमध्ये अडकलेली ताडपत्री दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, ही ताडपत्री काढून हा तांत्रिक बिघाड दूर होण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे घाटकोपर ते वर्सोवा हे मेट्रो सेवा पुढील तीन ते चार तास बंद राहण्याची शक्यता आहे.
Ghatkoper Versova Metro Train: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा पूर्ववत
घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात यश आले आहे. साधारण 1 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ओव्हरहेड वायरवरील ताडपत्री हटवून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात मेट्रोला यश आले. त्यामुळे वर्सोव्याच्या दिशेने जाणारी मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली आहे. सुरुवातीला हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी तीन ते चार तास लागतील, असे सांगितले जात होते. परंतु, सुदैवाने कमी वेळेत हा बिघाड दुरुस्त झाला आणि मेट्रोची वाहतूक पूर्ववत झाली.
आणखी वाचा
पुण्यात डेमू ट्रेनच्या डब्यात लागली आग, प्रचंड धूर अन् प्रवाशांची पळापळ; भयानक व्हिडीओ व्हायरल
























