एक्स्प्लोर
मुंबई महापौरांच्या गाडीला किरकोळ अपघात
खेरवाडी सिग्नलजवळ एक स्कूटी आणि महापौरांच्या गाडी यांचा एकमेकांना किरकोळ धक्का लागला.
मुंबई: मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला. खेरवाडी सिग्नलजवळ एक स्कूटी आणि महापौरांच्या गाडी यांचा एकमेकांना किरकोळ धक्का लागला.
यामध्ये चूक कोणाची यावरुन स्कूटीचालक आणि महापौरांच्या चालकाची बाचाबाची झाली. यावेळी स्कूटीचालकाने महापौरांच्या ड्रायव्हरला मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे.
मात्र मारहाण झाली नाही, केवळ बाचाबाची झाली, असं स्पष्टीकरण महापौरांनी दिलं. या बाचाबाचीनंतर वाद मिटला आणि दोघेही मार्गस्थ झाले.
दरम्यान, पश्चिम द्रूतगती मार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. या मार्गावर ट्रॅफिकच्या समस्या तर नेहमीचीच आहे. शिवाय हल्ली हायवेवर वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement