एक्स्प्लोर

55 वर्षीय प्रियकराचा 58 वर्षीय प्रेयसीवर प्राणघातक हल्ला, तोंडात सुतळी बाम्ब फोडून स्वत:ही जखमी

मुंबईत एका 55 वर्षीय प्रियकराने आपल्या 58 प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यानंतर स्वत:च्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडून घेतला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई : मुंबईत एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 55 वर्षीय प्रियकराने आपल्या 58 प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. एवढंच नाही तर महिला जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळल्यानंतर आरोपीने क्रूरपणे तिचे केस कापले. त्यानंतर सोबत आणलेला सुतळी बॉम्ब स्वत:च्या तोंडात फोडून घेतला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही धक्कादायक घटना मुंबईतील मालाडमधली कुरार विलेज येथील पुष्पा पार्कमध्ये घडली आहे. इथल्या इमारतीमधील एक 58 वर्षीय घटस्फोटीत महिला तिच्या 80 वर्षीय आई, दोन मुली आणि एका मुलासोबत राहते. या महिलेचे 55 वर्षीय वाहन चालक सचिन चौहान यांच्याशी प्रेमसंबंध होते. जवळपास 15 वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध असल्याने आरोपी सचिन चौहानचे महिलेच्या घरी येणे जाणे होते.

याच दरम्यान 1 नोव्हेंबरला सचिन चौहान प्रेयसीला भेटाण्यासाठी तिच्या घरी गेला होता. परंतु तिच्या आईने सचिनला घरात घेण्यास नकार दिला. यावरुन सचिनसोबत त्या महिलेचे आणि तिझ्या आईचे कडाक्याचे भांडण झाले. नंतर 15 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी सात वाजता ही महिला कामावर जाण्यासाठी निघताच सचिन चौहानने घरात प्रवेश केला. काही कारणाने पुन्हा सचिन आणि त्या महिलेमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण सुरु असतानाच सचिन चौहानने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि अंगावर सपासप वार केले. एवढंच नाही तर क्रूरपणे महिलेचे केस देखील चाकूने कापले. यानंतर सोबत आणलेला सुतळी बॉम्ब स्वत:च्या तोंडात फोडून घेतला. यात दोघेही गंभीर जखमी झाले असून दोघांवर कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. सध्या आरोपीविरोधात आयपीसीच्या विविध कलामांखाली गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला जात आहे, अशी माहिती कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rain Alert : आज मुंबई, ठाण्यात कोसळधार! कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
आज मुंबई, ठाण्यात कोसळधार! कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
Beed Lok Sabha: लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं, या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगलेय: पंकजा मुंडे
लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं, या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगलेय: पंकजा मुंडे
प्रवीण तरडे साऊथमध्ये खलनायकाच्या रोलमध्ये, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... अरारारा... खतरनाक 
प्रवीण तरडे साऊथमध्ये खलनायकाच्या रोलमध्ये, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... अरारारा... खतरनाक 
त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाणीचा आरोप, जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, घेतला मोठा निर्णय
त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाणीचा आरोप, जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, घेतला मोठा निर्णय
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 17 June 2024Pimpari Hawkers Women Beating : एसएसएफच्या महिला रक्षकांकडून भाजी विक्रेती महिलेला मारहाणSharad Pawar Vidhansabha Seat : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पुण्यातील 6 जागांवर दावाMaharashtra SuperFast :राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट  17 जून 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : आज मुंबई, ठाण्यात कोसळधार! कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
आज मुंबई, ठाण्यात कोसळधार! कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
Beed Lok Sabha: लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं, या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगलेय: पंकजा मुंडे
लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं, या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगलेय: पंकजा मुंडे
प्रवीण तरडे साऊथमध्ये खलनायकाच्या रोलमध्ये, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... अरारारा... खतरनाक 
प्रवीण तरडे साऊथमध्ये खलनायकाच्या रोलमध्ये, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... अरारारा... खतरनाक 
त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाणीचा आरोप, जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, घेतला मोठा निर्णय
त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाणीचा आरोप, जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, घेतला मोठा निर्णय
ह्रदयद्रावक.. वीजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, पती-पत्नीसह चिमुकला ठार, सुदैवाने बचावली मुलगी
ह्रदयद्रावक.. वीजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, पती-पत्नीसह चिमुकला ठार, सुदैवाने बचावली मुलगी
विधानसभेला राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?; तटकरे अहमदनगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघाचा आढावा घेणार
विधानसभेला राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?; तटकरे अहमदनगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघाचा आढावा घेणार
Kolhapur Police Recruitment : कोल्हापूर पोलिस दलातील भरतीचा मुहूर्त ठरला; अशी होणार भरती प्रक्रिया
कोल्हापूर पोलिस दलातील भरतीचा मुहूर्त ठरला; अशी होणार भरती प्रक्रिया
दोन वर्षांपासून प्रलंबित पुलाचे अर्धवट बांधकाम ठरतोय मृत्यूचा सापळा; खड्डयात पडून आणखी एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू
दोन वर्षांपासून प्रलंबित पुलाचे अर्धवट बांधकाम ठरतोय मृत्यूचा सापळा; खड्डयात पडून आणखी एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Embed widget