Mumbai Local Megablock : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज मध्य आणि हार्बर मार्गावर 'मेगाब्लॉक'
Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो, आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल? तर ही बातमी वाचाचाच....
Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो (Mumbai) आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा. आज मध्ये रेल्वेवर मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या (Central Railway) वतीनं देण्यात आली आहे. मध्ये रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी (आज) मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. रविवार असल्यामुळे आज धावणाऱ्या लोकलची संख्या काही प्रमाणात कमी असणार आहे.
कोणकोणत्या मार्गांवर मेगाब्लॉग?
मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. 05.06.2022 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग सकाळी 11.05 ते दुपारी 03.55 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. नियोजित थांबे घेऊन आपल्या गंतव्य स्थानकावर पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील.
सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. नियोजित थांबे घेऊन आपल्या गंतव्य स्थानकावर पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील.
पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून) सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलकडे सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरूळ दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू राहतीलब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ - खारकोपर दरम्यान उपनगरीय सेवा सुरू राहतील.
हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे, असं मध्य रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. तसेच,होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं, अशी विनंतीही मध्य रेल्वेच्या वतीनं प्रवाशांना करण्यात आली आहे.