एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक
मुंबई: मुंबई लोकलच्या तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. विशेषत: पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक असेल.
मध्य रेल्वेवर आज अप जलद मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते नायगाव स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
साधारणत: प्रत्येक रविवारी देखभाल आणि दुरुस्तीसाठी उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो.
मध्य रेल्वेवर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर ब्लॉक आहे.
या दरम्यान कल्याण ते ठाणे मार्गावरील अप जलद मार्गावरील वाहतूक अप धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल नियोजित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशिराने धावतील.
डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्यांना सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 या वेळेत घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी आणि भांडुप स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील.
पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बोरिवली ते नायगाव स्थानकादरम्यान जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान विरार-वसई ते बोरिवली-गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येईल.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांची वाहतूक सकाळी 10.20 ते 3.48 पर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान बंद राहणार आहे.
हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement