एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Mumbai Local : वकिलासंह कोर्टातील क्लार्कना मुंबई लोकलमधून प्रवासाची मुभा, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

वकिलांचाही फ्रंट लाईन वर्करमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता  वकील आणि कोर्टातील क्लार्कना मुंबई लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

मुंबई  : मुंबई लोकल (Mumbai Local) कधी सुरु होणार? याकडे सर्व मुंबईकरांचं लक्ष लागलं असताना आता वकिलांना आणि हायकोर्टातील क्लार्कना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. वकिलांचाही फ्रंट लाईन वर्करमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता वकील आणि कोर्टातील क्लार्कना मुंबई लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.  लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र वकील संघटनेकडे देणं अनिवार्य आहे. त्यानंतर संघटना वकिलांना पासच्या मंजुरीसाठी प्रमाणपत्र देणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवून तिकीट विंडोवर केवळ पास दिला जाईल, दैनंदिन तिकीट मिळणार नाही, अशी माहिती महाधिवक्त्यांनी हायकोर्टात दिली आहे. 

Mumbai Local : केवळ दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना लोकलप्रवासाची मुभा, बाकीच्यांचा प्रश्न कसा सुटणार?

यावेळी मात्र सर्वसामान्य जनतेचं काय? असा सवाल हायकोर्टानं केला. लस घेतल्यांना जर घरात बसावं लागतं असेल तर लसीकरणाचा उपयोग काय? असंही हायकोर्टानं म्हटलं आहे.  लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा सरकारचा मानस आहे, असंही महाधिवक्ता म्हणाले. सध्या चर्चगेट ते दहीसर प्रवास करायला किमान 3 तास लागत आहेत. सर्वसामान्यांचाही गांभीर्यानं विचार करा, असं हायकोर्टानं म्हटलं. गुरूवारपर्यंत यावर भूमिका स्पष्ट करू, असं आश्वासन महाधिवक्त्यांनी कोर्टात दिलं. 

 Mumbai Local : मुंबई लोकलसंदर्भात दोन दिवसात निर्णय घेतला जाईल; अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील : राजेश टोपे

वकिलांचाही अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये समावेश करावा, वकिलांनी केली होती मागणी

वकीलांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश करून लोकल ट्रेननं प्रवास करण्याची मुभा द्या, अशी मागणी करत काही वकीलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सगळ्याच वकिलांकडे स्वतःचे खाजगी वाहन नसल्याने मुंबईतील उपनगरांत राहणाऱ्या वकिलांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. हायकोर्टाने याची दखल घेत केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस बजावत दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आपतकालीन कायद्यानुसार राज्यभरातील कोर्ट सध्या सुरु आहेत. हायकोर्टाचा ऑनलाईन कारभार वगळता सत्र न्यायालय आणि इतर कनिष्ट न्यायालयात नियमित कामकाज सुरु आहे. जिथं कामासाठी वकीलांना प्रयक्ष हजेरी लावावीच लागते. त्यामुळे वकिलांचाही अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये समावेश करावा आणि त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी या मागणीसाठी चिराग छनानी यांनी अॅड. शाम देवानी आणि अॅड. भूमी कतिरा यांच्यावतीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

वकीलांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून लोकल ट्रेननं प्रवास करण्याची मुभा द्या; वकिलांची हायकोर्टात याचिका

काय म्हणाले होते आरोग्यमंत्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल कधी सुरु होणार, असा प्रश्न विचारला जातोय. लोकल बंद असल्याने नागरिकाना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे लोकल ट्रेन सुरु करा अशी मागणी होत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा झाली. मुंबई लोकल वाहतुकीसंदर्भात दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जाईल, अशा काही सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. यासंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? पोस्टरवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 04 October 2024NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? पोस्टरवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget