एक्स्प्लोर

मोठी बातमी! बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 22 हजार खारफुटीची झाडं तोडण्यास हायकोर्टाची सशर्त परवानगी, पण...

Mumbai, Thane, Palghar परिसरातील ही झाडं कामातील अडसर ठरत होती. सार्वजनिक हितासाठी परवानगी दिल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.त्याबदल्यात 2.5 लाख रोपांची लागवड करण्याची अट घालण्यात आली आहे.

Mumbai-Ahmadabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील (Bullet Train Project) आणखीन एक अडसर दूर झाला आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे (Mumbai Thane Palghar) या पट्ट्यातील 22 हजार खारफुटीची झाडं तोडण्यास हायकोर्टानं (Bombay High Court) परवानगी दिली आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशननं (Mumbai Ahmedabad high speed rail corridor) याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सार्वजनिक हितासाठी ही परवानगी दिली जात असल्याचं स्पष्ट करत या खारफुटी तोडल्यामुळे होणारी नुकसानाची भरपाई म्हणून 2.5 लाख रोपांची लागवड करण्याची अट हायकोर्टानं कंपनीला आहे. 

मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठानं आपला राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी जाहीर केला. एनएचआरसीएल कंपनीची खारफुटीची झाडे तोडू देण्याची मागणी मान्य करताना हायकोर्टानं त्यांना पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं दिलेल्या मंजुरीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींचे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. 

कांदळवन तोडली जाणार असून ठाण्यातील हरितपट्टाही प्रभावित होणार

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मुंबई - अहमदाबाद 'बुलेट ट्रेन' प्रकल्प आहे. 508 किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा 155 कि.मी लांबीचा पट्टा हा महाराष्ट्रातून जात आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील 21 ते 23 कि.मी लांबीच्या जागेवरील कांदळवन तोडणं आवश्यक होतं. त्यानुसार या प्रकल्पासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथील हजारो कांदळवन तोडली जाणार असून ठाण्यातील हरितपट्टाही प्रभावित होणार आहे. परंतु हा एक सार्वजनिक प्रकल्प असल्यानं केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयानं खारफुटीची झाडं तोडण्यास परवानगी दिली होती. यापूर्वी 53 हजार 467 खारफुटी तोडण्यात येणार होती, मात्र हा आकडा नंतर 21 हजार 997 एवढा कमी करण्यात आल्याची माहिती हायकोर्टाला देण्यात आली. 

दरम्यान, प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कांदळवन तोडण्याची परवानगी मिळालेली नाही, असा दावा करत बॉम्बे एन्व्हायर्नमेंट ॲक्शन ग्रुप या संस्थेच्यावतीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यातनं झाड कापण्याची परवानगी न देण्याची मागणी करण्यात आली होती. प्रकल्प उभारणीसाठी काही ठिकाणी केमिकल स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे. मात्र, तो परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश (इको सेंन्सिटिव्ह झोन) मध्ये मोडतो. याशिवाय तिथं उभारण्यात येणारं ठाणे स्थानक हे मुळात ठाणे जिल्ह्याच्या बाहेर आहे. ठाण्यातील हा परिसर फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी आरक्षित आहे.

या प्रकल्पामुळे त्याचंही नुकसान होणार आहे. बुलेट ट्रेन मार्ग ज्या आरक्षित वनक्षेत्रातून जाणार आहे त्यासाठी वन संवर्धन कायद्यांतर्गत यापूर्वी कोणतीही मंजुरी घेण्यात आली नाही तसेच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून आवश्यक परवानग्यांविषयी तपशीलही सादर केलेला नाही. याच संस्थेच्या मूळ याचिकेवर निर्णय देताना भविष्यात सार्वजनिक प्रकल्पासाठीही खारफुटी तोडायची असल्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी अनिवार्य केलेली आहे. हायकोर्टाच्या या निर्णयाला संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावं यासाठी स्थगिती देण्याची मागणी हायकोर्टाकडे केली होती मात्र ती नाकरण्यात आली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget