Mumbai Lalbaug Fire: जीव वाचवण्यासाठी बाल्कनीत लटकलेल्या सुरक्षारक्षकाचा खाली पडून मृत्यू
Mumbai Lalbaug Fire: या इमारतीच्या 19 व्या मजल्यावर आग लागलेल्या आगीचे लोटे हळूहळू आग 25व्या मजल्यापर्यंत पसरले.
मुंबईच्या (Mumbai) लालबागमधील (Lalbaug) करी रोड रेल्वे स्टेशनजवळ वन अविघ्न पार्क या इमारतीला (Avighna Park Building) आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास आग (Fire) लागली होती. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत 60 मजल्यांची असून 19व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. दरम्यान या दुर्घटेनेमध्ये येथील एका सुरक्षारक्षकाचा दुर्देवी अंत झाला आहे. या आगीपासून वाचण्यासाठी सुरक्षारक्षक चक्क बाल्कनीला लटकला. मात्र, हात सुटल्याने तो खाली पडला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
लालबागमधील वन अविघ्न पार्क घटनेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर! बांधकामात नियमांचे उल्लंघन
अरूण तिवारी (वय, 30) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तिवारी हा सुरक्षारक्षक होता. अविघ्न पार्क या इमारतीच्या 19 मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच अरूण तिवारीने पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग अंगावर आल्याने त्याने बाल्कनीमध्ये जाऊन खालच्या मजल्यावर उतरण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, हात सुटल्याने तो खाली पडला. त्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
शॉकसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या इमारतीच्या 19 व्या मजल्यावर लागलेल्या आगीचे लोटे हळूहळू आग 25व्या मजल्यापर्यंत पसरले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर निंयत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाला यश आले आहे. या इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असताना ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या इमारतीत रहिवाशी जास्त नव्हते. तर, काही कामगार घटनास्थळी उपस्थित होते.
या आगीच्या घटनेवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. इमारतीची फायर फायटीग सिस्टीम कार्यररत नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही घटनास्थळी जाऊन तेथील पाहणी केली आहे.