एक्स्प्लोर

गॉगलचोरीचा आरोप, मुंबईकर महिला युरोपमध्ये अडकली

दुकानातून गॉगल चोरल्याच्या आरोपामुळे मुंबईतील 59 वर्षीय महिलेला तुर्कस्थानातील कोर्टाने मायदेशी परतण्यास मनाई केली आहे.

मुंबई : मुंबईतील मुलुंडमध्ये राहणारी महिला युरोपमध्ये अडकून पडली आहे. दुकानातून गॉगल चोरल्याच्या आरोपामुळे तुर्कस्थानातील कोर्टाने तिला मायदेशी परतण्यास मनाई केली आहे. 59 वर्षीय रेणू नरुला 20 एप्रिलला 18 मैत्रिणींसोबत युरोप टूरवर फिरायला गेल्या होत्या. तुर्कस्थानातील इस्तंबुल विमानतळावर असलेल्या एका अॅक्सेसरिजच्या दुकानात काही जणी गेल्या होत्या. त्यांनी काही गॉगल घालून बघितले, मात्र कोणीच काहीही खरेदी केली नाही. दुकानातून बाहेर पडून सर्व जणी एका कॅफेत गेल्या. तिथे गॉगलच्या दुकानातील कर्मचारी आले आणि रेणू यांनी गॉगल चोरल्याचा आरोप त्यांनी केला. रेणू यांनी आरोप नाकारताच त्यांची बॅग घेऊन कर्मचारी दुकानात गेले. बॅगेत पासपोर्ट, पैसे असल्यामुळे रेणू त्यांच्या पाठोपाठ जात होत्या. दुकानात रेणू यांची बॅग कर्मचाऱ्यांनी तपासून पाहिली, तेव्हा त्यात दोन गॉगल्स सापडले. रेणू यांनी ते आपलेच गॉगल असल्याचं सांगितलं. गॉगलचे पैसे देण्याचा प्रश्नच येत नसल्याचं सांगितलं. दुकान कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेणू पर्समध्ये काहीतरी ठेवताना दिसतात. रेणू यांनी तो पेपर नॅपकिन असल्याचं सांगितलं, तर कर्मचाऱ्यांनी मात्र ते गॉगलचे प्राईज टॅग असल्याचा दावा केला. सीसीटीव्हीमध्ये आपण गॉगल चोरत असल्याचं कुठेही दिसलं नाही, असं रेणू यांनी सांगितलं. पोलिसांनी अखेर रेणू यांना कोर्टात नेलं, तर त्यांच्या मैत्रिणी अथेन्सला रवाना झाल्या. रेणू यांना कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याचं सांगत स्थानिक कोर्टाने त्यांना हॉटेल सोडण्यास मनाई केली आहे. त्यामुळे गेल्या बारा दिवसांपासून त्या तुर्कीतील हॉटेलमध्येच अडकल्या आहेत. 'माझे 94 वर्षीय सासरे घरी एकटे आहेत. माझ्याकडे असलेले पैसे संपत आले आहेत. इथे किती दिवस थांबायचं, हेही ते सांगत नाहीत' असा त्रागा रेणू यांनी व्यक्त केला. मुंबईत रेणू यांच्या मालकीचं बुटिक असल्याची माहिती आहे. रेणू यांचे जावई इस्तंबुलमध्ये दाखल झाले आहेत. तर त्यांच्या मुलीने परराष्ट्र मंत्रालय आणि तुर्कीतील भारतीय दूतावासाकडे मदत मागितली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget