एक्स्प्लोर
मुंबईत इमारतीच्या बांधकामावेळी कामगाराच्या छातीत रॉड घुसला
तिसऱ्या मजल्यावरुन पाय घसरुन राजेंद्र पाल थेट तळमजल्यावर खाली पडला. पडताना त्याच्या छाती आणि पोटात कॉलमचे रॉड घुसले.
मुंबई : इमारतीचं बांधकाम सुरु असताना तिसऱ्या मजल्यावरुन पडल्यानंतर छातीत रॉड घुसून कामगार गंभीर जखमी झाला आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला.
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत 21 वर्षीय राजेंद्र पाल हा कामगार तिसऱ्या मजल्यावर काम करत होता. त्यावेळी पाय घसरुन तो थेट तळमजल्यावर खाली पडला. खाली पडताना त्याच्या छाती आणि पोटात कॉलमचे रॉड घुसले.
त्याच अवस्थेत राजेंद्र बराच काळ राहिला. काही जणांनी त्याची मदत करण्याचे प्रयत्नही केले. अखेर अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने राजेंद्रला गॅसकटरच्या मदतीने बाहेर काढलं.
राजेंद्रची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement