एक्स्प्लोर
1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान
सगळ्यांनी केवळ कारवाई करण्याचं आश्वासनही दिलं, पण ती झाली आहे, असा आरोप इलियास खान यांनी केला आहे.
मुंबई : कमला मिल्स कम्पाऊंडमधील 1Above या हॉटेलविरोधात मुंबई महापालिका आयुक्त तसंच मुख्यमंत्र्यांकडे सात महिन्यांपूर्वीच तक्रार केली होती, पण कुठलीही कारवाई झाली नाही, असा दावा सामाजिक कार्यकर्ते इलियास खान यांनी केला आहे.
कमला मिल्स आग: पाच अधिकारी निलंबित
तक्रारीनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथे तपासणी करुन गच्चीवर अवैधरित्या हॉटेल बांधण्यात आल्याचा अहवाल दिला होता. आरोग्य विभागाचे निरीक्षक पी एम शिर्के यांनी 1Above चे मालक कृपेश संघवी यांना जुलै महिन्यात नोटीस देऊन सात दिवसात बांधकाम तोडण्याचे आदेशही दिले होते. पण नोटीस देऊनही हॉटेल बेकायदेशीरपणे सुरु होतं.
कमला मिल्स आग : आत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या भावांचा मृत्यू
याबाबत मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागांकडे तक्रार केली होती. सगळ्यांनी केवळ कारवाई करण्याचं आश्वासनही दिलं, पण ती झाली आहे, असा आरोप इलियास खान यांनी केला आहे.
कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली
तसंच महापालिकेच्या जी साऊथ वॉर्डमधील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळेच हे हॉटेल अवैधरित्या सुरु होतं आणि त्यामुळे आजची दुर्घटना घडली, असा दावा सामाजिक कार्यकर्ते इलियास खान यांनी केला आहे.
मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू
पाच अधिकारी निलंबित
कमला मिल अग्नितांडवात 14 बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. पालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कमला मिलच्या परवानग्यांशी संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई - जी साऊथ वॉर्ड ऑफिसर सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर अन्य पाच इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे.
निलंबित अधिकारी
- मधुकर शेलार पदनिर्देशित अधिकारी
- धनराज शिंदे ज्युनिअर इंजिनियर
- महाले सब इंजिनिअर
- पडगिरे - वैद्यकीय आरोग्य अधिकारी
- एस. एस. शिंदे -अग्निशमन अधिकारी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement