हिट अँड रननं पुन्हा मुंबई हादरली; वर्सोवा बीचवर झोपलेल्या रिक्षाचालकावर गाडी घातली, आरोपींना नागपुरातून अटक
Mumbai Hit and Run: हिट अँड रन प्रकरणानं मुंबई पुन्हा हादरली असून या अपघातात एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.
Mumbai Accident News : मुंबई : भरधाव कारं झालेल्या अपघातानं मुंबई (Mumbai Hit And Run) पुन्हा हादरली आहे. मुंबईतील (Mumbai News) हिट अँड रनच्या (Hit And Run Case) घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीत. अशातच वर्सोवातील (Varsova) घटनेनं मुंबईकरांच्या पायाखालची जमीन हादरली आहे. वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना आलिशान कारनं चिरडल्याची घटना सोमवारी घडली. या भीषण अपघातात (Accident News) एका व्यक्तीला चिरडलं गेलं आहे. तर, एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. मुळचे नागपूरचे रहिवासी असलेले निखिल जावटे (34) आणि ऐरोलीत राहणारा शुभम डोंगरे (33) अशी आरोपींची नावं आहेत. आरोपींनी मद्यासेवन केल्याबाबत शहानिशा करण्यासाठी रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
रिक्षाचालक असलेले गणेश यादव (36) आणि त्यांच्याबरोबर असलेले बबलू श्रीवास्तव हे अंधेरी-वर्सोवा समुद्रकिनारी झोपले होते. त्यावेली भरधाव कारनं त्यांना चिरडलं. या अपघातात गणेश यादव यांचा मृत्यू झाला आहे. बबलू श्रीवास्तव गंभीर जखमी झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रिक्षाचालकाला समुद्रकिनारी भरधाव एसयूव्हीनं चिरडलं
वर्सोवा बीचवर झोपलेल्या 36 वर्षीय रिक्षाचालकाला एसयूव्ही कारनं चिरडलं, त्यात त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला दुसरा साथीदार जखमी झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या कार चालकासह दोन जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. गणेश यादव असं मृत रिक्षाचालकाचं नाव आहे.
गणेश यादव हा वर्सोवा येथील सागर कुटीर येथे राहत होता. रविवारी रात्री गणेश आणि त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव वर्सोवा बीचवर झोपायला गेले. घरात खूपच गरम होत असल्यामुळे दोघांनी उघड्यावर समुद्रकिनारी झोपण्याचा निर्णय घेतला. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास एमएच-32-एफई-3033 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीनं समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या गणेश यांना चिरडलं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा साथीदार गणेश जखमी झाला.
गाडीखाली चिरडून रिक्षाचालकाचा मृत्यू
वर्सोवा बीचवर झोपलेले रिक्षाचालक गणेश यादव गाडीखाली येऊन चिरडले गेले. अपघात झाल्याचं लक्षात येताच, गाडी दोघांनी थांबवली आणि गाडीतून उतरुन गणेश यांना जागवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानं कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर लगेचच दोघेजण कार घेऊन तिथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी गणेशला उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला. वर्सोवा पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
कोर्टाकडून पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
वर्सोवा पोलिसांनी एसयूव्ही ड्रायव्हर निखिल जावळे (34), जो कॅब सर्व्हिसचा संचालक आहे आणि त्याचा मित्र शुभम डोंगरे (33) आणि कॅब व्यवसायात भागीदार आहे, या दोघांना नागपूरमधून अटक केली. आरोपींना मंगळवारी अंधेरी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, गुन्हा केल्यानंतर काही तासांतच चालक आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली. सुरुवातीला दोघेही दारूच्या नशेत असल्याचं दिसलं नाही. मात्र, घटनेच्या वेळी तो मद्यधुंद होता का? याची तपासणी करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर वाहनांना परवानगी नसली तरी, झोपडपट्ट्यांमधून जाणाऱ्या अरुंद वाटेनं कार घुसली आणि समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडलं.
स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पकडलं
एका स्थानिक रहिवाशानं त्याच्या मोबाईल फोनवर वाहनाच्या नंबर प्लेटचे छायाचित्र कॅप्चर केले, ज्यामुळे वर्सोवा पोलिसांना घटनेच्या तीन तासांच्या आत दोघांचा शोध घेण्यात मदत झाली. जावळे आणि डोंगरे यांनी त्यांच्या कॅब व्यवसायासाठी सतीशकडून कार भाड्यानं घेतली होती. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, जावळे आणि डोंगरे एका ग्राहकाला सोडल्यानंतर मुंबईत आले आणि समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले, तेव्हा ही घटना घडली, जिथे वाहनांना प्रवेश दिला जात नाही.