एक्स्प्लोर
शिवाजी पार्कवर शिवसेना आणि मनसेची मक्तेदारी नाही: हायकोर्ट
मुंबई: शिवाजी पार्कवर शिवसेना आणि मनसेची मक्तेदारी नाही, असे खडे बोल मुंबई हायकोर्टाने सुनावले आहेत. शिवाजी पार्क जिमखान्यानं याबाबतची एक जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. यावर निर्णय देताना मुंबई हायकोर्टाने शिवसेना आणि मनसेला फटकारले आहे.
तसेच वारंवार अखेरची संधी देऊनही राजकीय सभांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जात नसल्याचे निरिक्षणही हायकोर्टाने यावेळी नोंदवले आहे.
''शिवाजी पार्कचे मैदान हे मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी राखीव आहे. सायलेन्स झोन घोषित असताना ध्वनीक्षेपकांना परवानगी देताच कामा नये. तसेच त्यावर राजकिय पक्षांनी हक्क सांगू नये,'' असे हायकोर्टाने यावेळी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
त्याशिवाय नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागत समारंभासाठी लाऊडस्पीकरला हायकोर्टाने परवानगी यावेळी नाकारली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement