एक्स्प्लोर
रायन ग्रुपच्या पिंटो कुटुंबाला हायकोर्टाचा पुन्हा एक दिवसीय दिलासा
प्रद्युम्नतर्फे वकिलांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करण्यात आल्यामुळे आज होणारी सुनावणी उद्यावर ढकलण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबई : मुंबई हायकोर्टानं रायन ग्रुपचे सीईओ रायन पिंटो, एमडी ग्रेस पिंटो आणि अध्यक्ष ऑगस्टिन पिंटो या तिघांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी उद्यावर ढकलली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी रायन कुटुंबीयांवरची अटकेची कारवाई तात्पुरती टळली आहे.
गुरुग्राममधल्या रायन स्कूलमध्ये शिकणारा सात वर्षांचा विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूर याची हत्या करण्यात आल्यानंतर पिंटो कुटुंबावर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे कुटुंबातल्या तिघांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
प्रद्युम्नतर्फे वकिलांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करण्यात आल्यामुळे आज होणारी सुनावणी उद्यावर ढकलण्यात आल्याची माहिती आहे. पिंटो कुटुंब लवकरच मीडियासमोर येऊन त्यांची बाजू मांडणार असल्याचं त्यांच्या वकीलांनी सांगितलं.
प्रद्युम्नची गळा चिरुन हत्या
गुरुग्राममध्ये शुक्रवारी सकाळी सात वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूर या मुलाची शाळेच्याच बस कंडक्टरने गळा चिरुन हत्या केली. हत्येपूर्वी बस कंडक्टर अशोक कुमारने प्रद्युम्नच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. उत्तर विभागात रायन इंटरनॅशलनच्या 23 शाळा आहेत. त्यापैकी दिल्ली एनसीआरमधील 11 शाळांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
रायन इंटरनॅशनलच्या संचालकांना मुंबई हायकोर्टाचा अंतरिम दिलासा
मुंबईतील रायन स्कूलचीही पोलखोल, गेटसमोर दारुच्या बाटल्या
कर्नाटकच्या पिंटो यांनी मुंबई, दिल्ली कशी काबीज केली?
प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement