एक्स्प्लोर

Illegal Hawkers : तुम्हाला जमत नसेल तर कायदा लोकांच्याच हातात द्या; बेकायदा फेरीवाल्यांच्या मुद्यावर हायकोर्टाची तीव्र नाराजी

Mumbai HC On Illegal Hawkers : बेकायदेशीरपणे व्यवसाय करण्याचा जणू परवानाच फेरीवाल्यांना देण्यात आल्यासारखी स्थिती असल्याचं सांगत हायकोर्टाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. 

मुंबई: वारंवार निर्देश देऊनही जर कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाणार नसेल तर कायदा लोकांच्याच हातात द्या, मग करु द्या त्यांना काय करायचंय ते अशा शब्दात बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या मुद्यावर आपली तीव्र नाराजी व्यक्त करत हायकोर्टानं राज्य सरकारला गंभीर इशारा दिला. पोलीस चौकी जवळच जर अवैध फेरीवाले बिनधास्त व्यवसाय करत असतील तर मग पोलीस चौकीचा उपयोग काय? कारवाईला मनुष्यबळ कमी पडत असल्यास अधिकची फौज मागवा, पण कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टानं जारी केले आहेत.

मुंबईला अवैध फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे. पश्चिम उपनगरातील कांदिवली, बोरीवलीत तर चालायलाही जागा उरलेली नाही. असं असूनही प्रशासन कारवाई करण्यात सतत अपयशी ठरत आहे. बेकायदेशीरपणे व्यवसाय करण्याचा जणू परवानाच फेरीवाल्यांना देण्यात आलाय. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मुलभूत अधिकार पायदळी तुडवले जात आहेत त्याचं काय करायचं? असा सवालही हायकोर्टानं उपस्थित केला.

काय आहे प्रकरण?

बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या डझनभर याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती कमल खाथा यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. या सुनावणीत हायकोर्टानं पालिकेसह मुंबई पोलिसांनाही चांगलंच फैलावर घेतलं. यामध्ये आमचेही म्हणणे ऐकावे, अशी विनंती फेरीवाल्यांनी केली आहे. त्याची नोंद घेत हायकोर्टानं ही सुनावणी तूर्तास चार आठवड्यांसाठी तहकूब केली.

मात्र एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे व्यवसाय करताय याचा अर्थ तुमच्यावर कारवाई होणार नाही असं समजू नका. बेकायदा गोष्टी मुळीच खपवून घेणार नाही. अवैध फेरीवाल्यांवर कारवाई होणारच, असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Embed widget