एक्स्प्लोर

इकबाल मिर्चीचा साथीदार हुमायून मर्चंटला जामीन नाहीच, जामीनासाठीची पुनर्विचार याचिका हायकोर्टानं फेटाळली

Humayun Merchant: मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीनं हुमायून मर्चंटला 2019 साली अटक केली होती. तो इकबाल मिर्चीचा साथीदार आहे. 

मुंबई: मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं इकबाल मेमन उर्फ इकबाल मिर्चीचा साथीदार म्हणून अटक झालेल्या हुमायून मर्चंटला (72) जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. साल 2020 मध्ये दिलेल्या आदेशानंतर परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही त्यामुळे या अर्जाबाबतही दृष्टीकोण बदलण्यास कोणतंही कारण नसल्याचं न्यायमूर्ती भारती डांगरे स्पष्ट करत आरोपीचा अर्ज फेटाळून लावला.

ऑक्टोबर 2019 मध्ये 200 कोटींच्या मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीनं हुमायून मर्चंटला अटक केली होती. त्यानंतर 16 सप्टेंबर 2020 रोजी मर्चंटची जामीन याचिका न्यायमूर्ती भारती डांगरे यांनीच फेटाळून लावली होती. त्यानंतर आरोपीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र काही कारणास्तव ती याचिका मागे घेत हायकोर्टात पुनर्विचार याचिका सादर केली. ज्याला विरोध करत सध्याचा जामीन अर्ज हा पुनर्विलोकन अर्जाच्या स्वरूपातील आहे आणि त्यामुळे त्यावर विचार करता येणार नाही, असा युक्तिवाद ईडीच्यावतीनं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांनी केला. तसेच अर्जदाराचं वाढतं वय हे जामीन देण्यासाठी पुरेसं कारण असू शकत नाही म्हणून अर्ज नाकारण्यात यावा असा दावा ईडीकडून करण्यात आला. त्याची दखल घेत विशेष पीएमएलए न्यायालयातील न्यायप्रविष्ट खटला हा आरोपनिश्चितीच्या टप्प्यावर आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाच्या न्यायाधीशांना विनंती करून खटला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असं नमूद करत हायकोर्टानं मर्चंटला अर्ज फेटाळून लावला.

काय आहे प्रकरण?

इकबाल मिर्चीचे पैसे हुमायून साल 2005 पासून हवालामार्फत लपवत असल्याचा दावा करत अंमलबजावणी संचनालयानं मर्चंटला अटक केली होती. तेव्हापासून हुमायून तळोजा कारागृहातच आहे. त्यानं साल 2020 मध्येही सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात केला अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. 72 वर्षीय मर्चंट सध्या कारागृहात असून त्यांना विविध आजारांनी ग्रासलेलं आहे. त्यामुळे वैद्यकीय जामीन देण्यात यावा, असा पुनर्विचार अर्ज मर्चंटकडून करण्यात आला होता. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर नुकतीच सुनावणी पार पडली. मर्चंट जवळपास तीन वर्षांपासून तुरुंगात असून वाढत्या वयासोबत त्याला विविध आजारांनी ग्रासल्यामुळे तो जामिनावर सुटण्यास पात्र आहे. तक्रार आणि आरोपपत्राचा विचार करता प्रथमदर्शनी मर्चंटविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. एक दशकापूर्वी घडलेल्या कथित गुन्ह्याचा तपास जवळजवळ पूर्ण झाल्यामुळे मर्चंटकडून पुराव्यांशी छेडछाड होणार नाही, असा दावा मर्चंटच्यावतीनं ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी कोर्टात केला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour With Bhai Jagtap MVA Seat Sharing : Mumbai तील कोणत्या आणि कितीजागांसाठी मविआत संघर्ष?Zero Hour Full : मविआचं मुंबईतील जागावाटप ते वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारणABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Embed widget