एक्स्प्लोर
कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'
दुर्घटनेच्यावेळी महेश साबळे त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर होता. आग लागल्यानंतर महेशने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, तिथे असलेल्या लोकांना झटपट खाली पाठवायला सुरुवात केली.
मुंबई : मुंबईतील लोअर परेलमधील कमला मिल्स कम्पाउंडच्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीतील जखमींना केईएम आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अग्निशमन दलाने आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळवलं आहे. पण दुर्घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचण्याआधी असे दोन व्यक्ती तिथे उपस्थित होते, ज्यांनी सुमारे 200 जणांचा जीव वाचवला. महेश साबळे आणि सूरज गिरी अशी त्यांची नावं असून ते कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.
आग लागली तेव्हा महेश आणि सूरजने लोकांना तातडीने इमारीतमधून बाहेर काढायला सुरुवात केली, त्यामुळे सुमारे 200 जणांना जीव वाचला.
कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली
इथल्या इमारतीमध्ये तीन हॉटेल आहेत. ज्यात हॉटेल मोजेज बिस्त्रो, वन अबव आणि लंडन टॅक्सीचा समावेश आहे. आग लागली तेव्हा अडकलेले लोक बाथरुममध्ये जाऊन लपले आणि आग वाढल्याने त्यांचा गुदमरुन तिथेच मृत्यू झाला.
दुर्घटनेच्यावेळी महेश साबळे त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर होता. आग लागल्यानंतर महेशने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, तिथे असलेल्या लोकांना झटपट खाली पाठवायला सुरुवात केली.
मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू
महेशने सांगितलं की, "मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो, त्याचवेळी आगीमुळे लोक धावत माझ्या केबिनमध्ये आले. सुरुवातीला कोणाला बाहेर काढू आणि नको हे समजत नव्हतं. लोक एक्झिट डोअरजवळ उभे होते. नेमकं काय करावं कोणालाच कळत नव्हतं. डोअर आतून लॉक होता. तो दरवाजा मी तोडला आणि 15-200 लोकांना बाहेर काढलं. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाला कॉल करुन बोलावलं."
या कामात महेशला सूरज गिरी आणि संतोष नावाच्या दोन साथीदारांनी मदत केली. आगीनंतर महेशने या दोघांना अलर्ट केलं. महेश वरुन ज्या लोकांना खाली पाठवत होता, त्यांना सूरज आणि संतोष सुरक्षित बाहर पोहोचवत होते.
कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!
तर दुसरा सुरक्षारक्षक सूरज गिरी म्हणाला की, "वर मोठी आग लागली होती. एका गार्डने वरचा दरवाजा तोडला. आमच्या एका गार्डने मला कॉल करुन मी लोकांना खाली पाठवतोय, त्यांना सुरक्षितस्थळी घेऊन जाण्यास सांगितलं. ते जवळपास 200 लोक होते. त्यांना मी सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलो. त्यानंतर अग्निशमन दलाला कॉल केला."
महेश साबळे आणि सूरज गिरी या दोघांमुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले. त्यांनी प्रसंगवधान दाखवलं नसतं तर आज कमला मिल्स कम्पाऊंडमधील मृतांचा आकडा आणखी वाढलाही असता. महेश आणि सूरज या 200 जणांसाठी जणू देवदूतच बनून आले होते.
पाहा व्हिडीओ
मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
हॉटेल 1 Above चे मालक हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व एलएलपी कंपनीचे मालक आहेत. ONE ABOVE आणि मोजोज बिस्त्रो पब तेच चालवत असल्याची माहिती मिळत आहे. तसंच आगीची सुरुवात वन अबाव्ह रेस्टोबारमधून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
दरम्यान, ही दुर्दैवी घटना असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमला मिल्स कम्पाऊंडमधील आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
"कमला मिल्स कम्पाऊंडमधील दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो आणि तर जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत," असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
मृतांची नावं :
प्रमिला
तेजल गांधी (वय वर्षे 36)
खुशबू मेहता (वय वर्षे 28)
विश्वा ललानी (वय वर्षे 23)
पारुल लकडावाला (वय वर्षे 49)
धैर्य ललानी (वय वर्षे 26)
किंजल शहा (वय वर्षे 21)
कविता धरानी (वय वर्षे 36)
शेफाली जोशी
यशा ठक्कर (वय वर्षे 22)
सरबजीत परेला
प्राची खेतानी (वय वर्षे 30)
मनिषा शहा (वय वर्षे 47)
प्रीती राजगीरा (वय वर्षे 41)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement