एक्स्प्लोर
डोंबिवली सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्टेशन
मुंबई : मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानक सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्टेशन ठरलं आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीत डोंबिवली अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर ठाणे, तर तिसऱ्या क्रमांकावर घाटकोपर स्थानक आहे.
विक्रोळी, बदलापूर या स्थानकांनाही डोंबिवलीने मागे टाकलं आहे. 2016-17 या वर्षात डोंबिवली स्थानकातून दर दिवशी 2 लाख 46 हजार 161 प्रवाशांनी प्रवास केला. त्या खालोखाल ठाणे स्थानकातून दररोज 2 लाख 43 हजार 423 प्रवाशांनी प्रवास केला. 2015-16 च्या तुलनेत ठाण्याच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.
दिवा स्थानकावर फास्ट लोकल थांबण्यास सुरुवात झाल्यानंतर दिवा स्थानकानेही या आकडेवारीत आठव्या स्थानी झेप घेतली आहे. दोन वर्षांत दर दिवसाच्या प्रवासी संख्येत 17 हजारांनी वाढ झाली आहे.
मुंबई सीएसटी स्थानकातील दर दिवशीच्या प्रवासी संख्येत मात्र कमालीची घट झाली आहे. 2014-15 मध्ये या स्थानकातून दर दिवशी सरासरी 1,61,113 प्रवासी प्रवास करत होते. 2016-17 या वर्षांत ही संख्या 20 हजारांनी कमी होऊन 1,41,387 इतकी झाली आहे.
मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीची टॉप टेन स्थानकं
1. डोंबिवली
2. ठाणे
3. घाटकोपर
4. कुर्ला
5. मुलुंड
6. सीएसटी
7. भांडुप
8. दिवा
9. विक्रोळी
10. शीव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement