एक्स्प्लोर

Cruise Drugs Case: आर्यन खानला जामीन मिळणार? आज 8 आरोपींच्या याचिकेवर सुनावणी

Mumbai Cruise Drugs Case : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

Mumbai Cruise Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खान आणि सात इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्यन खानला कोठडी दिल्यानंतर आर्यन खानसह आठही जणांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला. या आठही जणांच्या जामीन अर्जावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला जामीन मिळणार की, कोठडीत वाढ होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खानची एक दिवसाची कोठडी संपल्यानंतर सोमवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयानं 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावणीत आली होती. ही कोठडी काल (7 ऑक्टोबर) संपली आहे. त्यामुळे आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचासह सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

न्यायालयानं सांगितलं की, कोरोना रिपोर्टशिवाय आरोपींना कारागृहात नेता येत नाही. त्यामुळे सर्वांना गुरुवारी रात्री एनसीबीच्या कार्यालयातच राहावं लागणार आहे. न्यायालयाचा हा निर्णय आरोपींच्या वकिलांनी मान्य केला. न्यायालयात सुनावणी दरम्यान, एनसीबीनं आरोपींची एनसीबी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, न्यायालयानं याला परवानगी दिली नाही. 

क्रूझवरील पार्टीसाठी परवानगी दिलीच कुणी? ड्रग पार्टी प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री

शाहरुखचा मुलगा आर्यन खान ज्या ड्रग्ज पार्टीमुळे कोठडीत आहे, त्यात आता मुंबई पोलिसांची एन्ट्री झाली आहे. कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, या पार्टीसाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पाच पेक्षा जास्त लोक याठिकाणी जमलेच कसे, याचा तपासही आता मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसही याप्रकरणात कलम 188 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या मुंबई पोलिसांनी विविध यंत्रणांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एनसीबी विरुद्ध मुंबई पोलीस असा संघर्ष पाहायला मिळत आहे. 

दुसरीकडे एनसीबी मुंबई पथकाच्या मदतीला देशभरातली पथकं धावून आल्याचं कळतंय. कारण सकाळपासून गुजरात, मध्य प्रदेश आणि दिल्ली एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळं एनसीबीचं पुढचं ऑपरेशन काय असणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

क्रुझवर कसं पोहोचलं ड्रग्ज?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पॅंट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसंच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये लपवून आणलं होतं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या क्रूझवर छापा मारत दहाहून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, काही जणांची रात्रीत चौकशी केल्यानंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या 8 ते 10 जणांपैकी एक जण बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्याचा मुलगा देखील असल्याची माहिती आहे. यात काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जरी असलं तरी आज कुणालाही कोर्टात हजर केलं जाणार नसल्याचं एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे. सोबतच कोणालाही अटक केली नसून तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चौकशीत काय माहिती पुढे येते आणि बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक केली जाते का? हे पाहाणं महत्त्वाचे असणार आहे. सोबतच आणखी एका अभिनेत्याची मुलगी देखील यात असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

ड्रग्जसाठी बिटकॉईन, डार्कनेटचा वापर

शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ज्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी कोठडीची हवा खावी लागतेय. त्या प्रकरणाची व्यापी फक्त दिल्ली-मुंबईपुरती मर्यादीत नाही, तर याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहेत. क्रूझवर पार्टीसाठी जे ड्रग्ज आणण्यात आलं होतं, त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला होता.  क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीनं आर्यन खानसह एकूण 8 जणांना अटक केली आहे. यांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर, एनसीबीनं एका मोठ्या ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेतलंय. या तस्कराच्या चौकशीनंतर ड्रग्जसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर झाल्याची माहिती मिळाली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  14  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Amisha Patela Dating With Nirvaan Birla: कोण आहे बिझनेसमन निर्वाण बिर्ला? ज्याच्या मिठीत शिरलीये गदर फेम 49 वर्षांची अमिषा पटेल, अफेअरच्या चर्चा?
"मेरे डार्लिंग के साथ प्यारी शाम..."; 49 वर्षांच्या अमिषा पटेलनं शेअर केला रोमॅन्टिक फोटो, कुणाला करतेय डेट?
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Embed widget